Rahatgaon (रहाटगाव)

रहाटगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान राहटगांव गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच महादेव मंदीराच्या दक्षिण बाजूच्या देवळात आहे.


जाण्याचा मार्ग :

रहाटगाव, पैठण-पाचोड सडकेवरील रहाटगाव फाट्यापासून उत्तरेस 1 कि.मी. आहे. 1) पैठण तेरहाटगाव फाटा 10 कि.मी. 2) पाचोड ते रहाटगाव फाटा 21 कि.मी. रहाटगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान रहाटगावच्या वायव्य विभागी महादेवाच्या देवळालगत दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात रिद्धपुरला जाताना पैठणहून रहाटगावला आले. येथे दुपारचा पूजावसर आरोगणा झाली. सायंकाळचा पूजावसर झाला आणि येथेच एक रात्र मुक्काम झाला. पैठणहून रिद्धपुरला जाताना सर्वज्ञांच्या सोबत बाइसे, हंसराज आणि चांगदेवभट होते. (पू.ली.140 स्था.पो.) दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ येथून कडेठाणला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


रहाटगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Rahatgaon : राहटगावि महालक्ष्मिये वसति :॥:
  • गोसावी उदयाचेया पाहारा एका राहटगावासि बीजे केले : गावांउत्तरें वायव्यें महालक्ष्मियेचें देउळः तेथ बाईसीं आसन रचिलेंः श्रीचरण प्रक्षाळिलेः दोपाहारांचा : पूजावसर जाला : आरोगणा जाली : चौकीं वसति जाली : उदया परिश्रयो सारिलाः उदका विनियोग जालाः मग उदयाचा पूजावसर जालेयानंतरे गोसावी बीजे केले :॥:
  • Purvardha Charitra Lila –
  • Rahatgaon : चांगदेवोभटातें खेळों पाठवणें :।।:
  • गोसावी उदेयाचा पाहार एकु चालतिः मग वस्तिचां गावीं राहातिः गोसावी विहरणा बिजें करीतिः आसन होएः एकाधा वेळ गोसावी चांगदेवभटांचे धाकुटेपण देखौनि कां तयांचा मनोभावो जाणौनि म्हणतिः ‘‘बटिका खेळों जाल?’’ तें शंका मानौनि म्हणतिः ‘‘नां जी न वचें:’’ गोसावी म्हणतिः ‘‘बटिकाः खेळो जाः एथौनि पाठविजते जाः’’ तेही म्हणतिः ‘‘हो कां जीः’’ मग तें जेउनी खेळो जातिः तयासि स्तीति होएः आणि स्वेछा खेळतिः जो खेळु खेळति जडींचेतनीं आपण सुखमय होतिः आणि तियें परमसंतोखातें पावैतिः ऐसीं धाव घेतिः ऐसीं धाव घेतिः आणि गोसावियांपासी येतिः दंडवत करीतिः आणि गोसावियांपासी बैसतिः ऐसें गोसावीं प्रतिदीनीं करवीति :।।:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पैठनवरुन राहटगाव येथे आले… येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: