Pusda (पुसदा)

पुजदा, ता. जि. अमरावती


येथील 4 स्थाने एकाच ठीकानी आहेत (श्रीगोविंदप्रभुबाबा) - ही स्थाने पुसदा गावांच्या मधोमध 2 मंदीरात आहेत. येथे गोपीराज मठ व महानुभाव आश्रम सुद्धा आहे. त्यात गोपाळाची नमस्कारी मूर्ती आहे.


जाण्याचा मार्ग :

मातुळग्रामहून पश्चिमेस पुजदा (रोहणखेडा मार्गे) 5 कि. मी. आहे. पुजदा, हे गाव, वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील दर्याबाद फाट्याहून 3 कि.मी. आहे. अमरावती ते पुजदा 24 कि. मी. पूजद्याला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. गावामध्ये गोपीराज मठ व महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील चारही स्थान.

1. गोपाळमूर्तीशी खेळ करणे स्थान :

हे स्थान पुजदा गावाच्या मध्यविभागी ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. हे ठिकाण ‘वैराग्यदेव संस्थान’ या नावाने ओळखले जाते. देवळात प्रवेश केल्यानंतर आपणास पूर्व व पश्चिम बाजूस दोन मोठे ओटे दिसतील. त्यापैकी पश्चिम बाजूचे गोपाळमूर्तीशी खेळ करणे स्थान होय.

लीळा : श्रीगोविंदप्रभू शिराळ्याहून पुनद्याला आले. त्यांच्या वेळी येथे गोपाळाचे देऊळ होते. या ठिकाणी उभे राहून त्यांनी गोपाळाच्या मूर्तीशी खेळ केला. (भी. प्र. ली. 205, स्था. पो.) श्रीप्रभू संबंधित गोपाळाची मूर्ति सध्या गावामध्ये गोपीराज मठात आहे.


2. आसन स्थान :

हे स्थान गोपाळमूर्तीशी खेळ करणे स्थानापासून पूर्वेस 17 फूट अंतरावर आहे.

लीळा : गोपाळमूर्तीशी खेळ केल्यानंतर श्रीगोविंदप्रभूना देवळाच्या चौकात आसन झाले. त्यावेळी बडव्याचा मुलगा गोपाळासाठी नैवेद्य घेऊन आला. तो नैवेद्य श्रीप्रभुंनीच आरोगण केला.

देवळाच्या मध्यभागी अष्टकोनी ओटे असलेली दोन्हीही स्थाने मांडलिक आहेत.


3. मादने स्थान :

हे स्थान गोपाळमूर्तीशी खेळ करणे स्थान देवळाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे बडव्याचे घर होते.

लीळा : श्रीगोविंदप्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते. त्यांनी या ठिकाणी बडव्यांच्या पूजा आरोगणेचा व वस्त्राचा स्वीकार केला. (भी.प्रत लीळा 206,स्था.पो.)


4. वसती स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस 9 फूट अंतरावर आहे.

लीळा : बडव्याने येथे श्रीप्रभूना मर्दना देऊन स्नान घातले. (भी.प्रत, लीळा 206, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी श्रीगोविंदप्रभू येथन मातुळग्रामला गेले.


पुजद्या ची एकूण स्थाने : 4




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: