Purangaon (पुरणगाव)

पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - पुरणगांव गावाच्या दक्षिणेकडे गावातच मंदीरात हे स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

पुरणगाव, पुणतांबा – वैजापूर मार्गावर पुणतांब्याहून ईशान्येस 4 कि.मी. आहे व वैजापूरहून किंचित् नैर्ऋत्येस 18 कि.मी. आहे. पुरणगावला जाण्यासाठी एस. टी बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान पुरणगावच्या दक्षिण विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सोमनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात धोत्र्याहून पुरणगावला आले. त्यांना येथे आसन झाले. (पू. ली. 291 ख. प्र., स्था. पो. उ. प्र.) गावातील मढांत त्यांचा एक रात्र मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी ते येथून सावखेड्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) गावाच्या उत्तरेचे मढातील वसती स्थान.

2) नारायण मढातील आसन स्थान.

3) सोमनाथाच्या ईशान्येच्या मढातील आसन स्थान.


पुरणगावची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –
  • Purangaon : पूर्णगांवीं सोमनाथीं आसनः मढीं वसति :॥:
  • पूर्णगांवांउत्तरे देउळः तेथ वसति जाली :॥:
  • (.. येथे हे पहील्यांदा येने.. येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे. स्वामी पुणतांबा-हिंगुणिवरुण आले व धोतरा-डोमेग्राम कडे निघले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: