Puntamba (पुणतांबा)

पुणतांबा, ता. राहाता, जि.अहमदनगर


येथे 11 स्थाने आहेत -
5 स्थाने पुणतांबा गावाच्या उत्तरेकडे गोदावरी नदीच्या काठावर रेल्वे पूलाजवळ भव्य पाताळगुंफा मंदीरात आहेत.
2 स्थाने पाताळगुंफा मंदीराच्या समोरच्या भागात आहेत.
तर 4 स्थाने पाताळगुंफा मंदीराच्या मागच्या बाजुस पायर्या उतरल्यावर गोदावरी नदीच्या काठावर आहेत.


जाण्याचा मार्ग :

पुणतांबा हे गाव, कोपरगावहून आग्नेयेस 23 कि.मी. आहे, व श्रीरामपरहून उत्तरेस 18 कि.मी. आहे. कोकमठाणहून आग्रेयेस पुणतांबा पायमार्गे 15 कि.मी. आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील श्रीरामपूर-कोपरगाव मधील पुणतांबा हे रेल्वे स्थानक आहे. तसेच पुणतांबा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे, व रेल्वे स्थानकाजवळ महानुभाव आश्रमही आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान आणि अवस्थान स्थान :

हे स्थान पुणतांबा रेल्वेस्थानकापासून उत्तरेस 1 कि.मी. अंतरावर, चांगदेव मंदिराच्या उत्तरेस व रेल्वे पुलाच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख पाताळ गुंफेत आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस कोकमठाणहून पुणतांब्याला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा 283 ख. प्रत, स्थान पोथी) व दुसऱ्या वेळेस नाऊरहून पुणतांब्याला आले. त्यावेळी त्यांचे येथे वीस दिवस वास्तव्य होते. सकाळचा, दुपारचा व सायंकाळचा असे तीन्हीही पूजावसर येथे होत असत. (पूर्वार्ध लीळा 286 ख. प्रत, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या उत्तर बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आरोगणा करीत असत. (पूर्वार्ध लीळा 286 ख.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान पाताळ गुंफेतून बाहेर येताच उजव्या हाताला उत्तराभिमुख कमानीमध्ये आहे. येथे पूर्व-पश्चिम, उत्तराभिमुख पटीशाळा होती. त्या पटीशाळेवरील हे स्थान होय. (स्थान पोथी उ. प्रत).

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. मादने स्थान :

हे स्थान आसन स्थानापासूस उत्तरेस 6 फूट 6 इंच अंतरावर दक्षिणाभिमुख लहान देवळात आहे. (स्थान पोथी उ. खा. द. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. आसन स्थान :

हे स्थान क्रमांक 3 आसन स्थानाच्या पूर्वेस उत्तराभिमुख गुंफेत आहे, (पूर्वार्ध लीळा ख. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. आसन स्थान :

हे स्थान दरडीखाली, पायऱ्या उतरून गेल्यावर डाव्या हाताला ईशान्याभिमुख लहान देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जळसेनाची देऊळी होती. त्या देऊळीतील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे (पूर्वार्ध लीळा 280 ख, प्रत, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. आसन स्थान :

हे स्थान 6 क्रमांकाच्या आसन स्थानापासून ईशान्येस 31 फूट 2 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (पूर्वार्ध लीळा 286 ख. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


8. खडकावरील आसन स्थान :

हे स्थान 6 क्रमांकाच्या आसन स्थान देवळापासून वायव्येस 33 फूट 11 इंच अंतरावर नदीच्या पात्रात आहे. (स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


9. आसन स्थान :

हे स्थान पाताळ गुंफेच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे कमळेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (पूर्वार्ध लीळा 286 ख. प्रत, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


10. आसन स्थान :

हे स्थान 5 क्रमांकाच्या आसन स्थानाच्या गुंफेपासून पूर्वेस 49 फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे कारटमठ होता. त्या मठातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (पूर्वाध लीळा 286 ख. प्रत, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


11. परिश्रय स्थान :

हे स्थान 10 क्रमांकाच्या आसन स्थान देवळापासून आग्नेयेस 26 फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे. (स्थान पोथी)

पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून नायगावला गेले व दुसऱ्या वेळेच्या वीस दिवसांच्या वास्तव्यानंतर ठाकूराच्या हत्येच्या निमित्ताने ते येथून हिंगोणीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. साळातीर्थी आसन स्थान.

2. कासेश्वराच्या देवळातील आसन स्थान.

3. विश्वेश्वराच्या देवळातील आसन स्थान.


पुणतांब्याची एकूण स्थाने : 14


  • Purvardha Charitra Lila – 278
  • Puntamba : पुणितांबां पातळगुंफे वसति :॥:
  • पूर्णगांवीं सोमनाथीं आसनः मढीं वसति :॥:
  • (…येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-कुंकुमठाणवरुण आले व नायगावकडे निघाले.)
  • Purvardha Charitra Lila – 281
  • Puntamba : पुणितांबां पातळगुंफे अवस्थान :॥:
  • गोसावी मागौते पुणितांबां बीजे केलेः पातळगुंफे ओटेयावारि अवस्थान जालेः दिस सांत तथा पांचः तेथ गोसावीयांसि तिन्ही पूजावसरु होतिः आरोगणा होयेः गुळुळा विडा होयेः मग काशेश्वरा विहराणा बिजे करीतिः कदाचित कारटमढसिः कदाचित कुमरेश्वराः कदाचित विश्वेश्वराः कदाचित जळसेनाः कदाचित दुसरिये पातळगुंफेः कदाचित खालीये देउळीः कदाचित विश्वनाथीः कदाचित साळतिर्थीः गोसावीयांसि विहरण होयेः कमळेश्वरा बिजे करीतिः तेथ आसन होये :॥:
  • उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी कारटमढां बिजें केलें: बाइसीं झाडुनि आसन केलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: भक्तिजना परावर निरूपण केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा कारटमढु गाः’’ भक्तिजनी म्हणितलें: ‘‘जी जीः कारटमढु म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘गांवींची जेतुकी माणुसे मरती तेतुकेयांची एथ कारटे किजेतिः जे एर गावीचे लोक येति तेही एथ कारटे करीति गाः म्हणौनि कारटमढुः’’ :।।:
  • एकु दी गोसावी साळातीर्थासि बिजें केलें: तेथ पुढें खडकावरि आसन जालें: भक्तिजनीं पुसिलें: ‘‘जीजीः साळातीर्थ म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ पींपळ होताः तया पींपळासि साळुंखी गुंतलीः तें सरलीः कोरडी जाली होतिः तियेचां एकु पाओः आणि एक पाख एथ जळसेनावरि पडिलाः तयाउपरि तें ब्राम्हणाचां ठाइं ब्राम्हणीं होउनि जन्मलीः मग तियेसी जातिस्मरत्व जालें: तिया सांघितलें: ‘मीं पूर्वि अमुकी होतीः’ ऐसीं अवघी व्यवस्था सांघितलीः आणि म्हणितलें: ‘तिये पींपळीं अद्यापी कोरडी असेः’ मग लोक तेथ पाहावेया आलाः तवं तेथ करवडी देखिलीः तें तेहीं काढिलीः तें एथ निक्षेपीलीः आणि तियेची स्थापना केलीः तें हें साळातीर्थ गाः कासेश्वरूः विश्वेश्वरूः वाराणसिः ऐसीं लोकी आक्षा प्रगटलीः’’ मग गोसावी गुंफैसि बीजेंकेलें :।।:
  • (टिप – पुणतांबा येथे स्वामी दुसर्यां दा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात यावेळी नायगाव-नाउर वरुण आले असताना ५ अथवा ७ दिवस थांबले तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 282
  • Puntamba : ठाकुरउपद्रवीं हींगुणीए प्राएण
  • एकु दीसीं गोसावीं प्रश्रयासि बीजें केलेंः तवं तेथ ठाकुरू मारूनि घातला होताः सर्वज्ञ म्हणीतलेंः ” हींसा वर्ते तीए स्थानीं माहात्मेयां असौं नैएः ” गोसावीं तैसेंचि तेथौनि बाहीरवाहीरें बीजें केलेंः सर्वर्ज्ञे म्हणीतलेंः ” जा गा मंडळीकाः बाइसांतें मात्रा घेउनि बोलावाः ” गोसावीं तेथौनि बीजें केलेंः ।।
  • (टिप – पुणतांबा येथे स्वामी दुसर्यां दा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात यावेळी नायगाव-नाउर वरुण आले असताना ५ अथवा ७ दिवस थांबले तेव्हाची ही लीळा.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: