PravaraSangam (प्रवरासंगम)

प्रवरासंगम, ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान प्रवरासंगम गावाच्या उत्तरेस दीड कि.मी. अंतरावर संगमेश्वराच्या (महादेवाच्या) मंदिरात आहे, चौक नमस्कारी आहे.


जाण्याचा मार्ग :

प्रवरासंगम हे गाव, अहमदनगर औरंगाबाद मार्गावर अहमदनगर हून 66 कि. मी. आहे. (1) औरंगाबाद ते प्रवरासंगम 50 कि. मी. (2) शेवगाव ते प्रवरासंगम 47 कि, मी. (4) गंगापूर ते प्रवरासंगम 11 कि. मी. (5) श्रीरामपूर ते प्रवरासंगम 46 कि. मी. प्रवरासंगम येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. संगमेश्वराच्या देउळातील आसन तथा अवस्थान स्थान :

हे स्थान प्रवरासंगम गावाच्या उत्तरेस दीड कि.मी. अंतरावर प्रवरा नदीच्या पूर्व काठावर संगमेश्वराच्या (महादेवाच्या) मंदिरात आहे, चौक नमस्कारी आहे. येथून वायव्येस 300 मीटर वर गोदावरी व प्रवरा नदीचे संगम दिसते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सुरेगाव-भालगाव असा मार्ग क्रमण करित पेहरासंगम येथे आले आले. त्यांचे या ठिकाणी 5-7 दिवस वास्तव्य होते. (उ. ली. , स्था. पो.).

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

प्रवरासंगम येथील खालील उत्तरार्ध लीळांची स्थाने अनुपलब्द्ध आहेत –

1. प्रवरेचे वाळवंट श्रीचरणी चरणांकीत स्थान.
2. वाळुजादेवीच्या देउळातील दोन्हि दारसंका धरुण भितरी अवलोकणे स्थान.
3. वाळुजादेवीच्या देउळातील आसन स्थान.
4. वशिष्ठदेवाच्या गुंफेतील अवस्थान.
5. पटीशाळेवरील आसन स्थान.
6. परिश्रय स्थान.
7. गुंफेच्या आंगणातील मादने स्थान.
8. संगमेश्वराच्या देउळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

(स्थानपोथी अथवा उत्तरार्ध लीळाचरीत्रामध्ये याचा उल्लेख येतो)


प्रवरासंगमचे स्थान : 9


  • Purvardha Charitra Lila – पेहरासंगमीं नागनाथीं वस्ति ।।:
  • मग गोसावी तेथौनि पेहरासंगमासि बिजें केलें: नागनाथाचां चौकीं पसिमामुख गोसावियांसि आसन जालें: तेथचि उदेयाचां पूजावसरानंतरें सकाळीचि आरोगणा जालीः गुळळा विडा जालाः मग शयनासनीं असतिः तवं महादेव पाठक आलें: दंडवत घातलें: श्रीचरणां लागलें: मग सर्वज्ञे म्हणितलें: “एथचें यजमान आले मांः” तेहीं म्हणितलें: “जी जीः गोसावी एथ बिजें केलें: ऐसें मीं नेणें जीः मीं गंगेसि आलाः तवं गोसावियांचीं श्रीमूर्ति झळकतां देखिलीः तैसाचि आला जी: तें गोसावियांचें दरीसन जालें: हेही गोसावीचि जाणविलें जीः” तवं सर्वज्ञं म्हणितलें: “हे अशेषा जीवासि जाणवी परि यातें कव्हणीचि नेणें:” सर्वज्ञे म्हणितलें: “सृष्टिमध्यें अशेषा जीवासि जाणवीः आपुले ज्ञानदान देः.



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: