Pohicha Dev-Dhangarwadi (पोहीचादेव-धनगरवाडी)

पोहीचा देव, ता. बीड, जि. बीड.


येथील स्थान पोहीचा देव घाटाच्या टेकड्यावर असलेल्या मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

पोहीचा देव हे ठिकाण बीड-सोलापूर राज्यमार्गावरील मांजरसुंभा गावापासन उत्तरेस 3 कि.मी. आहे. लिंब्याहन पोहीचा देव (मांजरसंभा मागे) 12 कि.मी. आहे. लिंबा ते मांजरसुंभा 9 कि.मी. बीड ते मांजरसुंभा 19 कि.मी. मांजरसुंभा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. पोहीचा देव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान मांजरसुंभा गावाच्या उत्तरेस 3 कि. मी. अंतरावर घाटाच्या अलीकडे, धनगरवाडी गावाच्या हद्दीत, बीड-सोलापूर राज्यमार्गाच्या पश्चिमेस डोंगरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पालीहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. सकाळचा पूजावसर झाला व दुपारची आरोगणाही येथेच झाली. (पू. ली. 322, पू. ली. 336 ख. प्र.) त्यानंतर सर्वज्ञ येथून लिंब्याला गेले.

सर्वज्ञांनी एकांकामध्ये येथे चर्मकाराला स्थिती दिली, असे बोलले जाते. परंतु स्थान पोथी या ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पोहीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 322
  • Pohicha dev : पव्हे आसनः प्रातः पूजा आरोगणा :॥:
  • मार्गीं मांजरसुंबाचां घाट वळघौनि घटमाथां पव्हेः तेथ नाईक आसन जालें: उदेयाची पूजा आरोगणा जाली :॥:
  • (…. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी बिडला ४ महिने वास्तव्य करुन पालीवरुन पोहिचादेव येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila – 27
  • Pohicha dev : चर्मकारां स्तीति :।।: / मार्गी चर्मकारां स्तीतिः विद्याप्रदान :।।:
  • बीडाजवळी गावां एकां बिजें करितां मार्गी पव्हेः तयापासी पींपळु होताः तया वृक्षातळी गोसावियांसि आसन असेः तें एके गावीचा हाट जालाः तवं चामारु आणि चामारी हाटा गेलीं होतीं: तियें दोघें हाट करौनि आलीं: चामारू तान्हैलाः पव्हे उदका आलाः तवं गोसावियांतें बैसलेया देखिलें: आणि गोसावियांपासी आलाः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः पुढा बैसलाः गोसावियांचें सौंदर्य देखौनि पाहों लागलाः पुडवाटवा सोडिता विनविलें: ‘‘जी मज विडीया देओं येतील?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसें एथ काही नाहीं:’’ मग पोफळफोडणेनि दोन फोडी केलियाः फोडी ओळगविलीयाः विडीया करौनि दिधलीयाः तवं मागिलाकडुंनि चामारी आलीः तियेसी विडा दिधलाः आपणही विडा घेतलाः तवं तिया म्हणितलें: ‘‘उठीसिना गाः गावां जाओं: सांघात गेलाः’’ तवं तेणें म्हणितलें: ‘‘पारूख पारूखः मग जावों:’’ क्षण एका मागुतें तिया म्हणितलें: ‘‘उठि गाः चालः लोक दुरी पावलाः माणुसांची नेहारी जालीः गोरूवे गावांकडें निगालीः वीळ जालाः कोण्हाकरवी काइ घोंगडा हिरउं पहातोसिः उठि गा चालः’’ पुढतिं त्रिशुद्धी तिया म्हणितलें: त्रिशुद्धी तेणें तैसेचि उत्तर दिधलें: तो नुठीचिः मग तिया म्हणितलें: ‘‘हां गाः तूं न येसि?’’ तवं तेणें म्हणितलें: ‘‘नाः’’ तिया म्हणितलें: ‘‘तरि मीं जावों?’’ तेणें म्हणितलें: ‘‘जाः’’ आणि पैल ठावोवेर्‍हीं गेलीं: तथा इतुकिया ऐसीं गेलीं: आणि मागौती आलीः मग म्हणितलें: ‘‘कां गाः तूं न येसि?’’ तेणें म्हणितलें: ‘‘न येः’’ तिया म्हणितलें: ‘‘तरि फेडी माझिये माथांचा हातुः’’ तेणें म्हणितलें: ‘‘फेडिला जायेः’’ तवं तिया म्हणितलें: ‘‘तरि कोण साक्षी?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना हें गोसावी साक्षीः’’ म्हणौनी गोसावियांकडें दाखविलें: तवं तिया म्हणितलें: ‘‘हां देव हो?’’ गोसावी भृभंगी श्रीमुकुटें मानिलें: मग तें निगालीः गोसावी तया चर्मकारातें कृपादृष्टी अवलोकिलें: तयासि गोसावियांपासौनि अनुपम्य स्तीति जालीः पाहारू एक आनंद भोगिलाः नावेक पातळ जालीः गोसावियां तांबुळ परीत्यजितां तेणें हात वोडविलेः तो प्रसादु घेतलाः विद्या जालीः तयातवं ‘मी कव्हण? काइ?’ ऐसें देहभाव विसरलेः तें लोकीं पुरूख होउनि वर्ततिः तें विचरत विचरत खोलनायकाचेया आंबेंयासि आलेः तेथ इश्वरपुरूख म्हणौनि इश्वरत्वें वर्ताे लागलेः तयाते लोक इश्वरपुरूख म्हणौनि घरोघरा जेवावेया नेतिः घरोघरी उटीतिः न्हाणीतिः चंदने चर्चितपूजाः धुपार्तिमंगळार्ति करीतिः आडवाटीं ठानवया जेवणः बाजासुपवतियावरि निद्राः ऐसीं घरोघरीं पूजा हो लागलीः एकु दीं एक आपुलेया घरा घेउनि गेलेः सर्वांगी चंदनाची भौरीः आडे गंधाक्षतां: निंबलोणः ऐसीं पूजा केलीः जेउं सुदलें: ऐसें सपूजीत जेउं बैसले असतिः तवं तयां पुरूखांचिये गावीचे चामार तेथ हाटासि आलेः तयांतु एकु वाहाणांचें जुतें द्यावया तया घरासि आलाः तेणें तयातें तैसें वर्ततां देखिलें: आणि तयातें म्हणितलें: ‘‘हा रेः तुज ऐसें काइ जालें? अमुकातमुका तो तू नव्हसि?’’ तवं तेथ ब्राम्हण होतेः तयासि पुसिलें: ‘‘यासि ऐसें किती दिस करिता?’’ तेहीं ब्राम्हणी म्हणितलें: ‘‘ना ऐसें आम्हीं बहुत दिस करीत असोः यातें तू ओळखतासि?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना होः’’ ब्राम्हणी पुसिलें: ‘‘हा कव्हण?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना हा आमचीए गावींचा सामा चाम्हांरू नव्हें: हा आमचा गोमतियाः याचीं मायेबापु यातें पाहातें असतिः हा एथ देवो जालाः येणें गावों विटाळिलाः’’ तेहीं ब्राम्हणीं कांटाळौनि म्हणितलें: ‘‘ऐसेः आ रेः कैसा अवघा लोकु विटाळिलाः’’ ऐसें एरू पुसेः एरू पुसें: अवघाइं आइकीलें: तैं जगळदेवो विंझदेवो अधिकार्ये मग तेयापासी अवघे महाजन आलेः तेहीं म्हणितलें: ‘‘जे हा चाम्हारूः एणें अवघा गांउं विटाळिलाः तरि ऐसयासि काइ किजे?’’ मग तेहीं निबंधकार प्रायश्चित्त देतेः स्मार्त ब्राम्हण बोलाविलेः तयातें पुसिलें: ‘‘हा चाम्हारूः येणें अवघा गांव विटाळिलाः तरि ऐसयासि काइ किजे?’’ निबंध काढविलें: निबंध पाहीलें: तवं निबंधीं कर्मविपाकीं ऐसें निगालें: जे ‘अकल्पीत करावें:’ मग तेहीं म्हणितलें: ‘‘यासि अलोपी करावेः चुनयांचीयां खडेयातु बैसवावेः वरि पाखाला सोडावियाः’’ तेहीं तयां पुरूखां तैसेचि केलें: खाच खाणविलीः तळी चुनखडें घातलेः तेथ तयातें बैसविलें: वरि चुनखडे ताउनी घातलें: तयावरि पाखाला रीचविलियाः केतुली एक मांदी मिनली होतीः तवं पैलाकडौनि एकीं हाटवटियेहुनि आलेः मांदी देखौनि एकातें पुसिलें: ‘‘हां गाः हें मांदी काइसी?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘तुम्ही नेणा?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना नेणोः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘एथ जे इश्वरपुरूख होउनि खेळत होतेः तें जातीचे चामार उमटलेः तेणें गांवो विटाळिलाः तयां पुरूखां तैसैनि तैसें केलें: तें मांदी मिन्नली असेः’’ मग एरीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं तयांसि काइ कराल? तें पैर्‍हां हाटांतु गळां माळः तोंडीं तांबुळ ऐसें खेळत असतिः तयांचीये गळांची माळ सुकेचिनाः मां खडेयात काइ दाटाल?’’ मग तें परस्परें उरोधलेः ‘‘जा पां: पाहाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘हो कां पाहों चालाः’’ मग अवघेचि हाटवटिएसि धांविनलेः पाहाति तवं सर्वांगी चंदनः लल्लाटीं चंदनाचा आडाः गंधाक्षताः गळा गळदंडेः पुष्पांचिया माळाः ऐसें सपूजीत खेळत देखिलेः आणि तयासि आश्चर्य जालेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तयाचीये गळाचा गळदंडा आदिकरौनि कोमाइजेचिनाः पूजा कणुही भरी विखरेचिनाः मग तें तेथौनि निगालेः तें अद्यापी आंबेंयाचा पसिमीली डोंगरी वानेमाजि बुटदरडीए असतिः’’ हे गोष्टि गोसावी प्रतिष्ठानी घाटेया हरीभटां प्रपंचविस्मृतिकरणी निवेदिलीः आणि बेलोपूरी उत्तम रश्मीसंचारनिषेदीं महादाइसाप्रति सांघितलीः मग महादाइसीं पुसिलेः ‘‘हां जीः एसणें तेहीं तयांसि केले तरि तयांसि काइ जालें जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तयातवं तयांचा निर्वंशु जालाः नरक जालें:’’ :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: