Pimpalgaon(Malavi) (पिंपळगाव-माळवी)

पिंपळगाव (माळवी), ता. जि.अहमदनगर


येथील 1 स्थान पिंपळगाव च्या पूर्वेस 2 कि.मी डांबरी रस्त्याच्या अगदी लगतच तलावात आहे. 


जाण्याचा मार्ग :

पिंपळगाव (माळवी) हे गांव अहमदनगर-वांबोरी रोडवर अहमदनगर पासून उत्तरेकडे 12 कि.मी.अंतरावर आहे. किंवा वांबोरी पासून दक्षिणेला 10 कि.मी.अंतरावर आहे.


स्थानाची माहिती :

1. पिंपळगावी मळ्यातील आसन व घोळाणा आरोगणे स्थान :

हे स्थान पिंपळगाव च्या पूर्वेस 2 कि.मी डांबरी रस्त्याच्या अगदी लगतच तलावात आहे. स्थानावर जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. तलावात गेल्याने पूर्वी हे स्थान अनुपलब्ध होते पण एप्रिल-मे 2012 च्या उन्हाळ्यात वांबोरी आश्रमतील ई. श्री. अतुलमुनी महानुभाव (काकाजी) यांनी स्थान शोधून काढला. दिनांक 14 मे 2012 या दिवशी प.पू.प.आचार्य श्री मामाजींच्या प्रेरणेने व प.पू.अतुलमुनी (काकाजी) वांबोरी यांच्या अथक प्रयत्नांनी श्रीक्षेत्र ‘पिंपळगाव माळवी’ जि.अहमदनगर या स्थानाचा शोध लागला होता. 14 मे हा या स्थानाचा स्थान प्रकट महोत्सव दिन व यात्रा दरवर्षी मोठ्या आनंदात व उल्हासात साजरा होत असतो.

लीळा : सर्वज्ञांच्या वेळी येथे गावाच्या पूर्वेस गावठाणानजीक एक मळा होता . त्या मळ्यात स्वामीनीं आसन स्वीकारले. बाईसासहित सर्व भक्तजन गावात भिक्षेला गेले. जवळच शेतात हरबरा होता. तो घोळण्याजोगा झालेला होता स्वामींजवळ उपाध्ये थांबलेले होते. स्वामी त्यांना म्हणाले, ” बटिका जा , घोळण्यासाठी हरबरा घेऊन या.” उपाध्यांनी हरबरा खुडून आणला. नंतर स्वामी त्यांना पुन्हा म्हणाले, “बटिका जा, आता बोरे घेऊन या.” उपाध्ये गेले. जवळच एक बोरीचे झाड होते . त्या बोरीची बोरे ते घेऊन आले. परंतु ती बोरे आंबट आणि किडकी होती . त्यामुळे स्वामीनीं उपाध्यांना दूरवर एका बोरीच्या झाडाकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाले, “बटिका जा, त्या बोरीची बोरे फार गोड आणि मधुर आहेत. ती घेऊन या.” उपाध्ये गेले . बोरीखाली बोरांचा सडा पडलेला होता . त्यातील चांगली चांगली वेचून ओटीभर बोरे ते घेऊन आले . तोपर्यंत बाईसा आणि भक्तजनही भिक्षा करून आले . स्वामीनीं हरबऱ्याचा आमसर खुडा आणि बोरे बाईसांकडे देत म्हणाले, “बाई याचा घोळणा करा आणि भक्तजनांसहित आम्हाला अर्पण करा. आम्ही आज घोळणामुख्य भिक्षान्नांची आरोगना करू.” बाईसांनी चणा आणि बोरे घेतली. ती एकत्र कालवून त्यावर आले, मिरपुड, हिंग, मीठ टाकले. वरून लिंबू पिळले आणि चांगले हालवून एकजीव केले. नंतर स्वामीना ओळगाविला व प्रसाद केल्यानंतर काही ठेवून उरलेला भक्तजनांना वाटून दिला . त्यादिवशी स्वामीनीं भिक्षान्न आणि घोळणा याचीच आरोगना केली. आणि तसेच पापविनाशनीकडे प्रयाण केले. (पु.ली. 364, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पिंपळगाव माळवी चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 364



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: