Pimpalgaon Hareshwar (पिंपळगाव हरेश्वर)

पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा जि.जळगाव


येथील एक स्थान पिंपळगाव हरेश्वर गावाच्या उत्तरेस शेतात 2.5 कि.मी अंतरावर आहे.


जाण्याचा मार्ग :

पिंपळगाव हरेश्वर चे स्थान, शेदुर्णीं-पाचोरा मार्गावर असलेल्या आंबेवडगावहून दक्षिणेस 6 कि.मी. आहे. शेंदुर्णी ते आंबेवडगाव 11 कि.मी; पाचोरा ते आंबेवडगाव 16 कि.मी. आहे. आंबेवडगाव ला महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

1. वृक्षाखालील स्थान :

हे स्थान पिंपळगाव हरेश्वर गावाच्या उत्तरेस 2.5 कि.मी अंतरावर आंबेवडगाव रोड च्या पूर्वेस शेतात पूर्भिवाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमनाच्या पूर्वार्ध काळात भडेगाव-पाचोरा-शेदुर्णींवरुण पींपळगावला आले, व येथे आसन झाले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 416
  • Pimpalgaon : लखुबाइसां संबोखुः पींपळगावीं वस्तिः ।।: / देमाइसां: लखुबाइसां पाठवणी :।।: / प्रथम वसतिः लखुबाइसां संभोखु :।।:
  • लखुबाइसें: देमाइसें: सेंदुरणीसि सन्निधानी होतीः मग गोसावी सेंदुरणीहूनि बिजें करूं आदरिलें: उदेयाचि गोसावी देमाइसाः लखुबाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्ही पुढें चालाः हें मागिलीकडुनि येइलः मार्गि साने गावीं भिक्षा नाहीं:’’ लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘जीः आम्हीं गोसावियांसरीसिया येउनिः’’ तवं बाइसीं कोपौनि घागरा बांधला आणि म्हणितलें: ‘बाबा म्हणताती तें न करीति कीः’’ तेथ तयांसि आणि बाइसांसि काही तुडपुड जालीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जाः मां पुढीलिये पेणा मागुती भेटालः’’ म्हणौनि आधी लखुबाइसें: देमाइसें गावां पाठविलीः मग तियें दंडवतें करौनि निगालीः मागिलाकडुनि तयाची गावां विळीचाचा वेळी गोसावी बिजें करिता एका वृक्षाखाली आसन जालें: एका वृक्षातळीं तिये होतीः लखुबाइसीं गोसावियांतें देखिलें: आणि म्हणितलें: ‘‘देमाइः देमाइः गोसावी बिजें केलें: चाल जावों गोसावियांचिया दरीसनाः’’ देमाइसीं म्हणितलें: ‘‘ना आइः मीं न येः तूं जाएः’’ लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘कां न या?’’ देमाइसीं म्हणितलें: ‘‘जाइजैल आणि बाइसें विसारूं लागतीः’’ लखुबाइसीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं न या तरि न याः परि मीं जाइनः’’ तियें गोसावियांपासी आलीं: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः बैसलीं: आणि बाइसां विसारूं लागलीं: इतुलेनि तियें तैसीचि निगालीं: देमाइसांपुढां सांघो लागलीं: ‘‘तुम्हीं म्हणितलें: तेचि जालें: गेलीये आणि तेथ जवं उभी ठेलीएं तवं बाइसे विसारूंचि लागलीः तुम्हीं न याचि तें बरवें केलें:’’ बाइसाची दृष्टी चुकौनि गोसावी तयांचेया बिढारा बिजें केलें: गोसावियांसि आसन घातलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: तीं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः मग गोसावियांजवळी बैसलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः ये एथचेया दरीसना आलीं: तुम्हीं न या तें काइ?’’ देमाइसीं म्हणितलें: ‘‘ना जी येइजे आणि बाइसें विसारूंचि लागतिः जी जीः बाइसां हातीं येवो न येः आतांची लखुबाइसांसि गोसावियांदेखतां काइ जालें: आणि भलतेंव्हा जें जे बोलताती तेहीं गोसावी आइकतातीः’’ मग गोसावी तेयांसि निरूपण केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः तुम्हां होआवी वोढाळ गोरूवाची परिः’’ देमाइसीं म्हणितलें: ‘‘ते कैसी जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘माळेयावरि जो सेतकरी असे तो आपुलें वळ्हातें राखत असें: वोढाळ गोरू असेः तो थै थै म्हणें: तें थै थै म्हणता तवं एकु घांसु घेउनि जाएः तो तयांसि घांसु तवं फळे कीं: तैसें होआवें कीं देमतीः’’ मग लखुबाइसातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बाइसें तुम्हांसि ऐथचिये सेवेलागी म्हणतिः शिक्षापण करीतिः परि आपुलेया स्वार्था न करीति तरि बाइसांचें ओखटें घेणें तें एथिचेंचि घेणें म्हणां:’’ यावरि गोसावी चेइलेयाचा दृष्टांत निरूपिलाः ऐसें गोसावी पाहार एकु निरूपण केलें: मग तियें श्रीचरणां लागलीं: आणि गोसावी तयातें बिढारा घेउनि आलेः मग बाइसीं म्हणितलें: ‘बाबों यांसि राहों दिधलें: आतां कांहीं म्हणोचि न येः’’ म्हणौनि तयासि स्नेहचि करीतिः आप्तृत्व करीति :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुण पींपळगावला आले. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: