Phulambri (फुलंब्री)

फुलंब्री, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान फुलांबरी गावातच मंदीर आहे, याला मोहल्ल्याला काथार गल्ली म्हणून ओळखतात.


जाण्याचा मार्ग :

फुलंब्री हे गाव; जळगाव-औरंगाबाद मार्गावर औरंगाबादहून किंचित् ईशान्येस 25 कि.मी. आहे. व सिल्लोडहून नैर्ऋत्येस 35 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान फुलंब्री गावाच्या मध्यभागी कथार गल्लीत पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात राजूरहून फुलंब्रीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. सर्वज्ञांच्या वेळी येथे मठ होता. तो कोणी बांधला याची कथा सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितली. (पू.ली. 177, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून गदान्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) मढाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान


फुलंब्रीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Phulumbri : फुलंबरीये मढीं वस्ति :।।:
  • गोसावी फुलंबरीए बिजें केलें: गावांतु दक्षिणें पाषाणाचा उत्तराभिमुख मढुः तेथ मढीं खंबापासिं बाइसीं आसन रचीलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: श्रीचरणक्षाळण केलें: वस्त्रें श्रीचरण परिमार्जीलेः पूजावसरः आरोगणा जालीः गोसावी गुळळाः विडाः पहूड उपहूड होउनि आसनी उपविष्ट असतिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः इतुकीं देउळें मढमंडप देखिलें परि हें शोभा नाहीं: ऐसा हा एवढा मढु कोणें केला? सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ब्राम्हणु एकु वाटा जातु होताः कव्हणीं एकी ठाइं थिलरी एकी सिध्दरसु होताः तेणें उदक म्हणुनि करवतीं भरीलाः परि तो सिध्द रस ऐसें नेणेः तो ब्राम्हण ब्राम्हणा एकाचा घरीं उतरलाः करवती नेउनी घरांआंतु खुंटीएसि ठेविलीः आपण कणवृत्तिसि बाहीरि गेलाः थेंब पडताती म्हणौनि गृहीचां खाली ताट ठेविलें: तेया ताटावरि करवतियेचें थेंब पडीतिः तें ताट वेधलें: सुवर्ण जालें: तवं घरीचां घरधनी बाहीरिलीकडुनि आलाः तयासि तें ताटीं जेउं घातलें: तेणें पुसिलें: ‘‘हें ताट कोणाचें?’’ घरीचां म्हणितलें: ‘‘आमचें:’’ तेणें पुसिलें: ‘‘हें कोठें ठेविले होतें?’’ घरीचां म्हणितलें: ‘‘ना एथ सागळेखालीः’’ मग तेणें वरीली वास पाहीलीः तवं खुंटीये सागळ देखिलीः मग तेणें पुसिलें: ‘‘हे सागळ कव्हणाची?’’ घरीचां म्हणितलें: ‘‘ना हें एक ब्राम्हण ठेउनि गेला असेः’’ तेणें तेथ आणिक ताट ठेविलेः तवं तेहीं सुवर्ण जालें: तेतुकैनि तेणें जाणितलें: हा तवं सिध्दरसुः मग तेणें करवतियेसी रसु होता तो ओतुनि घेतलाः करवती आणिकें पाणीए भरीलीः मागौति खुंटीएसि घातलें: तवं जयाची करवती तो आलाः करवती घेउनि गेलाः मग घरीचेनि धनियेः तेणें रसें ताटेः थाळेः ताबीएः लोखंडे जेतुली होती तेतुली सुवर्ण केलें: तेणें द्रव्यें हा मढु केला बाइः’’ :।।:
  • (टिप – येथे स्वामी पहिल्यांदा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोडविहीरा-राजौर वरुण आले व पुढे गद्याना वरुन वेरुळ्कडे गेले….)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: