Phaltan (फलटण)

9. श्रीचक्रपाणी अवताराचे संबंधित तळे :

हे तळे मलटण विभागात मराठी शाळा क्र. 6 च्या पाठीमागे आहे.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू या तळ्यामध्ये हत्ती धूत असत. (श्रीच. च. ली. 31, फ. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


10. भुवनेश्वराच्या चौकातील विहरण स्थान :

हे स्थान मलटणच्या नैर्ऋत्य विभागी तळ्याच्या उत्तरेस भुवनेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवाळाच्या चौकात आहे. आज हे देऊळ. ‘श्रीदत्त’ मंदिर या नावाने ओळखले जाते.

लीळा: श्रीचक्रपाणीप्रभू विहरणासाठी येथे येत असत. त्या वेळी देवळाच्या चौकात त्यांना आसन होत असे व याच ठिकाणी ते देवळाच्या दक्षिण बाजूच्या अन्नछत्राच्या मठात ब्राह्मणांना भोजन देत असत. व पूर्व बाजूच्या पटीशाळेत संन्याशांना भोजन देत असत. (श्रीच. च. ली. 31, फ. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


11. विहरण स्थान :

हे स्थान भुवनेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस दगडी मंडपात आहे. येथे एक लहान ओटा बांधून त्यात श्रीदत्तात्रेयप्रभुंचे विशेष बसविलेले आहेत. या स्थानाजवळील पापाणाचा घोडा नमस्कारी असल्याचे बोलले जाते. परंतु या संबंधी लेखी पुरावा अजून तरी उपलब्ध झालेला नाही.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू विहरणासाठी आल्यावर येथेही त्यांना आसन होत असे. (वि. फ. स्था. पो. क्र. 538)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


12. विहरण स्थान :

हे स्थान 11 क्रमांकाच्या विहरण स्थानाच्या पूर्वेस पूर्वाभिमुख दारवठ्याच्या आत आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू विहरणासाठी आल्यावर येथे आसनस्थ होत असत. (श्रीच. च. ली. 31, फ. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


13. सदाशिवाच्या चौकातील विहरण स्थान :

हे स्थान श्रीदत्त मंदिराच्या ईशान्येस सदाशिवाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू येथे विहरणासाठी येत असत. त्या वेळी देवळाच्या चौकात त्यांना आसन होत असे. (श्रीच. च. ली. 31, फ. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 4 वर ज्याण्यासाठी ‘4’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾