Phaltan (फलटण)

5. अवस्थान स्थान :

हे स्थान फलटण शहराच्या दक्षिण विभागी शुक्रवार पेठेत पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ, ‘आबासाहेब’ मंदिर या नावाने ओळखले जाते. प्राचीनकाळी येथे रंभाइसाचे घर होते.

लीळा : रंभाइसा ही श्रीचक्रपाणीप्रभूची एका नात्याने मावशी होती व एका नात्याने सावत्र आई होती. जनकाइसाला पुत्र होईना म्हणून जनकनायकांनी जनकाइसाची धाकटी बहीण रंभाइसा हिच्याशी विवाह केला. परंतु काही काळाने रंभाइसाला पुत्र न होता जनकाइसालाच पुत्र झाला. तेव्हा जनकनायक रंभाइसाला म्हणाले, ” हा मुलगा जनकाइसाचा नसून तुझाच आहे. त्यांनतर श्रीचक्रपाणी प्रभू एक वर्षाचे झाल्यावर रंभाइसा जनकनायकांना म्हणाली, ‘मागे तुम्ही मला हा मुलगा तुझाच आहे, असे म्हणाले होते. तरी आता घेऊन जा म्हणा. मग मी माझ्या घरी घेऊन जाईन.” यावर जनकनायक म्हणाले, ” घेऊन जा” रंभाइसाला फार सुख वाटले. तिने श्रीचक्रपाणी प्रभूंना कडेवर घेऊन आपल्या घरी आणले. रंभाइसाने श्रीचक्रपाणीप्रभूचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. त्यांचे या ठिकाणी दहा वर्षे वास्तव्य होते. (श्रीच. च. ली. 9, 11, फ. स्था. पो.)

येथील इतर लीळा : 1. सर्पाला श्रीकराने गोंजारणे (श्रीच. च. ली. 13)
2. नगरजनांची सर्व संकटे दूर करणे. (श्रीच. च. ली. 16)
3. जनकनायकांनी येथेच श्रीचक्रपाणीप्रभुंची मुंज केली. (श्रीच. च. ली. 16)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


रंगशिळेच्या पाच भागांपैकी एक भाग या देवळाच्या सभामंडपात चौथऱ्यावर स्थापन केलेला आहे.


6. रंगशिळा, वेदाध्ययन स्थान (मळ्यातील रंगशीळा) :

हे स्थान आबासाहेब मंदिराच्या नैर्ऋत्येस कासार विहिरीच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : प्राचीनकाळी या ठिकाणी रंगनाथाचे देऊळ होते. रंभाइसा श्रीचक्रपाणीप्रभूना कडेवर घेऊन येथे येत असे. देवळाच्या चौकात वर्तुळाकार परंतु चौकोनी अशी मोठी शिळा होती. त्या शिळेवर श्रीचक्रपाणीप्रभू बालपणी खेळत, रांगत आणि याच शिळेवर बसून ते रूपनायकांकडून वेदांचा अभ्यास करीत असत. (श्रीच.च.ली.11,12)

रंगशिळेचे काही काळाने काही कारणांमुळे पाच विभाग झाले. त्यातील एक भाग याच ठिकाणी (मळ्यातील रंगशीळा) स्थापन करण्यात आला असून दुसरा भाग आबासाहेब मंदिराच्या सभामंडपात चौथऱ्यावर स्थापन करण्यात आला आहे. तिसरा व चौथा भाग रविवार पेठेतील शिंपी आळीमध्ये उत्तराभिमुख देवळात (गावातील रंगशीळा) स्थापन केलेला आहे आणि पाचवा भाग रंगशीळा मंदिर पोगरवाडी ता. जि. सातारा येथे रंगुबाईवाडीत पूर्वाभिमुख देवळात स्थापन केलेला आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. स्नान विहिर स्थान :

ही विहीर रंगशिळा, वेदाध्ययन स्थान देवळाच्या दक्षिण बाजूस आहे. आज ही विहीर ‘कासार’ विहीर या नावाने ओळखली जाते.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू वयाच्या सातव्या वर्षानंतर दररोज लहान मुलांच्या सोबत या विहिरीमध्ये स्नान करीत असत म्हणून ही विहीर अत्यंत पवित्र व नमस्कारी आहे. (श्रीच. च. ली. 16, फ. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


8. माणिकेश्वरी चौकी आसन स्थान :

हे स्थान फलटण शहरातील शुक्रवार पेठेत माणिकेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू या देवळाच्या चौकात बसून पुराण निरूपण करीत असत. तसेच विहरणासाठी आल्यावर त्यांना चौकात आसन होत असे. (श्रीच.च.ली. 30, फ. स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 3 वर ज्याण्यासाठी ‘3’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾