Patur (पातूर)

पातूर, ता. पातूर जि. अकोला


पातूर येथील 1 स्थान पातूर गावातच दक्षिनेकडे बोडखा पांधनीवर बाजुला वाळुकेश्वराचे पूरतन मंदीर आहे, या मंदीराच्या पाठीमागे हे स्थान आहे. जीपने जाता येते.


जाण्याचा मार्ग :

पातूर हे गाव अकोला-मालेगाव मार्गावर अकोल्याहून दक्षिणेस 32 कि. मी. आहे. व मालेगावहून उत्तरेस 29 कि. मी. आहे. बाळापूर ते पातूर 29 कि.मी. आलेगाव ते पातूर (बाभूळगाव मार्गे) 22 कि.मी. आलेगावहून ईशान्येस पातूर (कार्ला, आसोला मार्गे) 11 कि.मी. आहे हा पायमार्ग आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पातूर गावाच्या दक्षिणेस 1 कि.मी. अंतरावर बोडखा गावाकडे जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात उत्तराभिमुख गाभाऱ्यात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वाळुकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात वडनेरभुजंगहून पातूरला आले. त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 86, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आलेगावला गेले.

एकांकातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून आलेगाव ला गेले व पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून टाकळी ला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. स्मशानातील वस्त्र स्वीकार करणे स्थान.

2. पूर्वार्धातील वैजनाथी वसतीस्थान.

3. वैजनाथ देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


पातूरची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 86
  • Patur : पातुरूडीं समसानवस्त्र स्वीकारू :।।:
  • मग गोसावी पातुरडा बिजें केलें: ऐसें नैथडिया नैथडिया बिजें करितातीः तें स्याळे दिसः हीवं थोरः लखलख सीं वाजत होतें: तेणें हाड फुटत असेः तेथ दहनस्थळींये वस्त्र होतें: तें गोसावी ऐसें डाविये श्रीचरणीचेनि आंगुठेनी उचलिलें: मग श्रीकरें घेतलें: स्वीकरिलें: तवं तेथ अंत्यजु अपगुनि स्मशान राखतु होताः तेणें म्हणितलें: ‘‘हा हाः आमचें राखीचें वस्त्र दिसवडीचा दिसवडी तूंचि नेतोसी रेः सांडीसांडीः’’ म्हणौनि बोबातु धांविनलाः जवळी आलाः तवं गोसावियांतें देखिलें: मग गोसावी दोही श्रीकरीं धरूनि वस्त्र विशीर्ण करौनि दाखविलें: तेणें तें जीर्ण देखिलेः गोसावी त्यजिलें: आणि तो विनउं लागलाः ‘‘स्वीकरिजो जीः स्वीकरिजो जीः’’ म्हणौनि निडळ भुइंसीं लाविलेः तो ओळगउं लागलाः पुढां आड पडेः पुढतिं पुढतिं विनविलें: परि गोसावी न स्वीकरीतिचिः मग वाळुकेस्वरीं वस्ति जालीः मग गोसावी एरी दिसीं बिजें केलें :।।: (…येथे वडनेरहून स्वामी पहिल्यांदा आले. पुढे स्वामी आलेगाव ला गेले. :॥:)
  • Purvardha Charitra Lila – 147
  • Patur : Patur : पातुरडीं वसति :॥:
  • मग गोसावी पातुरासि बीजे केले : गावांपश्चिमें वैजनाथाचां देउळी आसन जालेः बाईसीं चरणक्षाळण केलेः आणि उपहार निफजउ आदरिलाः गोसावीयांसि पूजावसरु जालाः आरोगणा जाली : गुळुळाः विडा जालाः पहुड जालाः गोसावि चांगदेवभटाते खेळावया अन्मोदन केलेः इतुकेनि तें खेळो गेलेः गोसावीयांसि वाळुकेश्वरि विहरण जालेः वैजनाथाचां देउळीं वसति जाली :॥: (…येथे आलेगावहून स्वामी दुसर्यांदा आले. पुढे स्वामी टाकळीला गेले. :॥:)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: