Parner (पारनेर)

पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर


येथील 2 स्थान - पारनेर गावाच्या पश्चिमेकडे 3 कि.मी.अंतरावर डोंगराच्या पायथ्यात सिद्धेश्वर महादेव मंदीर आहे. या मंदीरातील सभामंडप/चौक म्हणजे 1 स्थान होय. व दुसरे स्थान 18 व्या पायरीच्या खाली पारेश्वर महादेव लहान मंदीर आहे. या मंदीरातील सभामंडप/चौक म्हणजे दुसरे स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

पारनेर हे गाव , अहमदनगरहून नैर्ऋत्येस (भाळवणी, जामगव मार्गे) 38 कि. मी. आहे व सुपा मार्गेही 38 कि. मी. आहे. भाळवणी हे गाव, नगर-कल्याण मार्गावर आहे व सुपा हे गाव, नगर-पुणे मार्गावर आहे. पारनेरला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान पारनेर गावाच्या पश्चिमस 3 कि. मी. अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात सिद्धेश्वराच्या (सोमनाथाच्या) पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे. देवळाला एकूण तीन दरवाजे आहेत. एक दक्षिणाभिमुख, एक उत्तराभिमुख एक पश्चिमाभिमुख उत्तराभिमुख दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या हाताचा जो चौक, तो नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात नेप्तीहून पारनेरला आले. त्यांचे या ठिकाणी सात दिवस वास्तव्य होते. (उ.ली. 285, स्था, पो.) त्यानंतर ते येथून लोणीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

2. पूजा, आरोगणा स्थान :

सिद्धेश्वराच्या देवळात उत्तराभिमुख दरवाजातून बाहेर पडणे. देवळापाठीमागील 18 पायऱ्या उतररून खाली जाणे. खाली गेल्यावर तेथे पारेश्वराचे (महादेवाचे) पूर्वाभिमुख लहान देऊळ आहे. त्या देवळाच्या चौकात हे स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना या येथे दुपारचा पूजावसर होत असे आणि त्यांचे दुपारचे भोजनही याच ठिकाणी होत असे. (उ.ली. 286, स्था.पो.उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या दक्षिणेच्या गुंफेतील पूजा, आरोगणा स्थान.
2. मादने स्थान.
3. घाटी आसन स्थान.
4. देवळाच्या आग्नेयेचे चरणचारी उभे राहणे स्थान.
5. पारेश्वराच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान.


पारनेरची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: