Pargaon-Jogeshwari (पारगाव-जोगेश्वरी)

पारगाव-जोगेश्वरी, ता. आष्टी, जि. बीड.


येथील स्थाने पारगांव गावाच्या वायव्येकडे जोगेश्वर मंदीरात सभामंडपात डाव्या बाजुस 2 खांबाच्या मधे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

पारगाव (जोगेश्वरी) हे गाव, आष्टीच्या दक्षिणेस आष्टी खडकत मार्गावरील पारगाव फाट्यापासून 2 कि.मी. आहे. आष्टी ते पारगाव फाटा 9 कि.मी. खडकत ते पारगाव फाटा 9 कि.मी. शिराळा ते पारगाव फाटा 16 कि.मी. शिराळ्याहून पारगाव पायमार्गे (हणमंतगाव, टाकळसिंग मार्गे) 10 कि.मी. आहे. पारगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पारगावच्या वायव्येस 500 मीटर अंतरावर जोगेश्वरीच्या पूर्वाभिमुख देवळाच्या सभामंडपात दक्षिण बाजूस (डाव्या बाजूस) दोन खांबांमध्ये ओटा आहे.

लीळा :1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात वाकीहून पारगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 271, स्था.पो.)

2) स्त्री व्यभिचाराच्या आळंच दोषापासून व्यापाऱ्याचे रक्षण करणे व त्याच्या उपहाराचा स्वीकार करणे. (उ. ली. 271) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ येथून परत वाकीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान


पारगावची एकूण स्थाने : 2


  • Utarardha Charitra Lila – 271
  • Pargaon (Jogeshari) : पारेगावीं जोगेस्वरीए वस्तिः अभियोगें व्यवहारा रक्षणें :।।:
  • गोसावी पारेगावा बिजें केलें: जोगेस्वरीचां चौकीं आसन जालें: तवं व्यवहारा एकु तियें गावीचाः तयातें मारावेया दंदी पाठीं लागलेः तो तियें नासी लपाला होताः तवं गोसावियांतें देखिलें: तो पळत गोसावियांपासी आलाः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः राखावें जीः आले जीः शरण आला जीः’’ तवं तें आलेः गोसावी शिष्टाइ केलीः मग तें निगालेः तेणें म्हणितलें: ‘‘जी जीः मज पुश्चळैकेचा अव्हिळावो आलाः तो मीं आजी तीनि दिस ए नासीसि लपालां असेः मज तिन उपवास पडिलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः आतां तुमची वास कोण्हीं न पाहेः’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः मीं गोसावियांलागौनि उपहार घेउनि येइनः’’ मानिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः भेओं नको होः’’ तेयाचें कव्हणी काहीचि न करीतिचिः उपहारू आणिलाः पूजावसर जालाः आरोगणा जालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायको कळीयुगीं तस्करत्वः पुश्चळत्वः हा धर्म स्वरुपीं न वर्ते ऐसां विरळाः’’ तेणें म्हणितलें: ‘‘ते कां जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जिएचा एकु अवेवु देखिलेयां अलगाचिए मुनैवरि घालीः पाठी सरणावरि तियेचें सर्वांग देखेः परि आडपालव वोडउनी जायेः कां माजवी तें तेथ नाहीं:’’ मग वस्ति जाली :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि मढपिंपरी-वांकी असा मार्ग क्रमण करित पारेगाव येथे आले. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: