Pargaon-Ghogas (पारगाव-घोगस)

पारगाव (घोगस), ता. शिरूर कासर, जि. बीड.


येथील स्थान हे पारगांव (घोगस) गांवच्या मधोमध असलेल्या पारेश्वर महादेव मंदीरात सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

नागलवाडीहून पूर्वेस पारगाव 2 कि.मी. अंतरावर आहे. पारगाव (घोगस) येथे जाण्यासाठी पाथर्डी पाडळशिंगी मार्गावरील माथुरी गावापासून रस्ता आहे. माथुरी-भगवानगड मार्गावर धोगस पारगाव आहे. पारगावला जाण्यासाठी गेवराईहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पारगावच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पारेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात चकलांब्याहून पारगावला आले. (उ.ली. 573, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून खरवंडीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) गावाच्या पश्चिमेचे काटेरी झाडाखालील आसन स्थान.


पारगावची एकूण स्थाने : 2


  • Utarardha Charitra Lila – 573
  • Pargaon (Ghogas) : पारेगावीं पारेस्वरी वस्ति :।।:
  • उदेयाचां पूजावसर जालेयानंतरे सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकाः मात्रा कराः एथौनी बिजें किजेलः’’ आउसीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि मात्रा केलीः मग गोसावी पारेगावा बिजें केलें: गावापसिमे कांटिये तळी आसनः तेथ पारेस्वराचा देवाली वस्ति जाली :।।:
  • (..उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांबा-सेकटा-चकलांबा असा मार्ग क्रमण करित पारेगाव(घोगस) येथे आले व वस्तीस थांबले तेव्हाची ही लीळा…)




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: