Pandhari (पांढरी)

पांढरी, ता. गेवराई, जि. बीड.

येथील 8 स्थाने 2 ठीकानी आहेत - 1) पांढरी गावातच मधोमध मंदीर आहे येथे 1 स्थान आहे.

2) पापविनाशीनी येथील 7 स्थाने - पांढरी गावाच्या पश्चिमेकडे 1 कि.मी. अंतरावर किंवा मिरगांव गावाच्या पूर्वेकडे 2.50 कि.मी..अंतरावर पडक्या महादेव मंदीराजवळ गोदावरी नदीच्या काठावर एकाच ठीकानी आहेत.

जाण्याचा मार्ग :

मिरगावहून पूर्वेस पांढरी पायमार्गे दोन कि.मी. आहे. तसेच तलवाडा मार्गे पांढरीला वाहनाने जाता येते. तलवाडा ते पांढरी 6 कि.मी. बागपिंपळगाव ते तलवाडा 15 कि.मी. (महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य यांचे पांढरी हे गाव होय.)

स्थानाची माहिती :

पापविनाशनी येथील स्थाने :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 7 स्थाने एकाच परिसरात आहेत)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान मिरगाव च्या पूर्वेस 1 कि.मी. (रोड ने 2.5 कि.मी.) व पांढरीच्या पश्चिमेस 1 कि.मी. (रोड ने 3 कि.मी.) अंतरावर (पांढरी गावाच्या हद्दीत) ओताच्या पूर्व काठी गोदावरी नदीच्या दक्षिण थडीवर पापविनाशनीच्या (महादेवाच्या) देवळालगत पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पांढरीहून पापविनाशनीला आले. त्यांचे येथे तीन दिवस (लीळाचरित्राप्रमाणे) तथा पाच दिवस (स्थान पोथीप्रमाणे) वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून मिरगावला गेले, (पू. ली. 509, स्था. पो.)

2) राणाइसाला भिक्षाविधी निरुपणे (पू.ली. 510)

2. दारसंका आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून उत्तरेस 20 फूट 10 इंच अंतरावर लिंगाच्या पूर्वेस देवळात आहे. (वि. स्था. पो. क्र. 892)

3. आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्वेस बाभळीच्या झाडापासून 66 फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे. (वि. स्था. पो. क्र. 892)

4. जगतीचा दारवठा स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस 8 फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ येथे चरणचारी उभे राहत असत. (स्था.पो.)

5. अवधूता भेटी स्थान :

हे स्थान जगतीचा दारवठा स्थानाच्या आग्नेयेस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पापविनाशनीला आले, तेव्हा अवधूत घागर घेऊन पाणी आणण्यासाठी निघाला होता. त्याची व सर्वज्ञांची येथे भेट झाली. त्यावेळी सर्वज्ञांच्यापासून अवधूतास स्थिती झाली. (पू.ली.509, स्था.पो.)

6. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान अवधूता भेटी स्थानापासून किंचित आग्नेयेस उत्तराभिमुखं देवळात आहे. (स्था.पो.) पिंपळाच्या पारावरील हे स्थान होय.

7. चोर कुमती हरणे स्थान :

हे स्थान चरणचारी उभे राहणे स्थानापासून ईशान्येस 54 फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : एके दिवशी रात्री चोर येत होते. त्यांचा आवाज भक्तजनांनी ऐकला. बाइसांनी सर्वज्ञांना सांगितले, “बाबा चोर आले.” सर्वज्ञ देवळाच्या बाहेर आले. येथे उभे राहिले. मग खांकरले. चोरांना वाटले, येथे कोणीतरी माणसे आहेत; म्हणून ते नदीच्या थडथडीने निघून गेले. (पू.ली.511,स्था.पो.)

पापविनाशनी येथील स्थाने संपूर्ण.

8. आसन स्थान :

हे स्थान पांढरी गावाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात साडेगावहून पांढरीला आले. त्यांना येथे आसन झाले. त्यावेळी श्रीनागदेवाचार्यांचे धाकटे भाऊ, वैजोबा आले. त्यांनी सर्वज्ञांना वाळुके अर्पण केली. (पू. ली. 508, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अनुपलब्ध स्थान :

(1) पापविनाशनीच्या देवळाच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान.

पांढरीची एकूण स्थाने : 8

  • Purvardha Charitra Lila – 508
  • Pandhari : डोणी उतरणें: पूरीं आसन :।।:
  • गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः गोसावी गंगेचिये थडी वरिलीकडें बिजें केलें: डोणीपासी आलेः उभे राहिलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘डोणी कां सुआना?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः डोणीसि समस्तीं महाजनीं आण वाइली असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें भिक्षु महात्मे यांसि काइसी आणः सुआ डोणीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जीः आम्हां आवलूं नयेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें तुम्हांसि आवलूं लागैलः’’ मग तेही डोणी घातलीं: गोसावी फुटेयाची तळसुती केलीः गोसावी डोणीवरि उभे ठाकलेः बाइसें: लाखाइसें बैसलीं: राणाइसीं बैसावें तवं नावेंक डोणी परती गेलीः मग गोसावी श्रीकरू देउनि राणाइसें डोणीवरि बैसविलीं: मग श्रीकरीं आवला घेउनि डोणी आवलिलीः तें उजूचि नेलीः पेंडी लावलीः मग तयासि विस्मयो जालाः तेहीं म्हणितलें: ‘‘हे काइ जीः ऐसीं डोणी कव्हणी आवलू नेणें जीः जी आमचें जन्म गेलें परि आम्हीही नेवो नेणो जीः कैसी उजुचि नेलीः’’ मग तिहीं आवला हातीं घेतलाः डोणी कडें लाविलीः गोसावी डोणीवरूनि उतरलेः बाइसें उतरलीं: लाखाइसें उतरलीं: अवघीं भक्तिजनें उतरलीं: राणाइसें उतरावीं: तवं डोणी नावेक परती गेलीः मग गोसावी श्रीकरू देउनि राणाइसांतें उतरिलें: तवं बाइसें कोपलीं: ‘‘हें काइ वो जालें रांडेसि? मगा तरि मगां बाबाचां श्रीकर धरूनि चढलीः आतां तरि आतां बाबाचा श्रीकरू धरूनि उतरलीः बाबाचा श्रीकरू दुखवेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि काइसेया कोपतें असा? हें यासीचि करूं आवडत असेः’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. ” पूरीं(पांढरी) येथे टेकावरि आसन होतें:” तेव्हाची ही लीळा. त्यानंतर स्वामी पापविनासनीकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 508
  • Pandhari : पूरीं वैजो वाळुकें स्वीकारू :।।:
  • गोसावी पूरासि बिजें केलें: पूरीं टेकावरि आसन होतें: वैजोबा आलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें पूरापासी वैजोबाचे सेतः तेथ कांटियेतळीं आसन जालें: वैजोबाए दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: दोनि वाळुकें दरीसना केली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. ” पूरीं(पांढरी) येथे टेकावरि आसन होतें:” तेव्हाची ही लीळा. त्यानंतर स्वामी पापविनासनीकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 509
  • Pandhari : पापविनासनी अवस्थान :।।: पूरीं(पांढरी)
  • तैसेचि गोसावी पापविनासनां बिजें केलें: दिस तीनि अवस्थान जालें: पापविनासनीं चौकीं रीगतां डावेया हाता पूर्वाभिमुख द्वारः पूर्वाभिमुख दारवंठां: दारवंठेयापूर्वे पींपळुः पींपळाउत्तरे पारावरि आसन दक्षिणीलिया कोनटेयाआग्ने परिश्रय स्थान :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. स्वामींचे पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 509
  • Pandhari : अवधूतां भेटिः स्तीति :।।: पूरीं(पांढरी)
  • तवं तेथ अवधूत एकु घागरीसीं उदका निगालाः दारवंठां पींपळातळी गोसावियांसी दरीसन जालें: गोसावियांपासौनि तयां स्तीति जालीः भंगलीः मग घागरी ठेविली आणि भेटी जालीः दंडवतें घातलीं: गोसावियांचिया श्रीचरणां लागलें: मग तें गोसावियांसि अनुसरलेः गोसावियांचें सेवा दास्य करूं लागले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. स्वामींचे पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 510
  • Pandhari : राणाइसां भिक्षावीधि निरूपण :।।: / राणाइ झोळीदानपूर्वक भिक्षावीधि निरूपण :।।: पूरीं(पांढरी)
  • गोसावी राणाइसातें पुसिलें: ‘‘बाइः तुम्हीं आपुला गावीं काइ करा?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः धान्य मागोः कातों: बापु सेतडीया मागेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः धान्य कां मागां?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः वरोलागीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काता कां?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः तेल मीठ होएः वस्त्र कापड होए जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः कातिजे ना होः धान्य न मागिजेः’’ तिया म्हणितलें: ‘‘जी तरि काइ करावें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ अनुसरिजेः भिक्षा मागिजें होः भिक्षा निकीः भिक्षान्न खाइजेः तेल लोण न खाइजेः मग तैसीचि सवे लागेः’’ तिया म्हणितलें: ‘‘तरि धडुतपणासि काइ करूः धडुते काइसेयाचें करूं? दैन्यरूप तरि असवेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जियाचि परि अन्न मागिजेः तियाची परि वस्त्र मागिजेः मग तयाची चिंता नाहीं: बाइः सुडें मागिजेति मग आपुले आंग झाके ऐसें हात बारा किजेः आपणेयांतें झांकिजेः आंचळे बहिर्वास न नेसिजेतिः’’ तवं राणाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः मागितलेया कव्हण देइल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पृथ्वीएसणें रवण असे आणि परमेस्वराएसणी देवता असेः मां चिंधी चिरकुटी नेणो कैसी मिळेल कीं: भलतें चिंधी चिरकुटी देः मां तुम्हां दैन्य तें कें असे? तें चिंता काइ तुम्हांसि? आपण ऐसें निरभिलाषिायं होआवें: निरसां: निराशां: निराश्रयां होउनि असावेः निरपेक्षां होआवें: निरभिमानियां होआवें: ऐसें अनन्यगती इश्वरासि शरण रीगावें: मां जें करावें तें करीलः बाइः एथ अनुसराः’’ ऐसें निरूपण केलें: राणाइसीं म्हणितलें: ‘‘ना जी मीं गांवा जाइनः कापूस आहे तो कांतीनः मग अनुसरैनः’’ राणाइसें पापविनासनीहुनि गोसावियांतें पुसौनि कापूस कातावया गावासि गेलीः तवं तो जळीन्नलाः मग म्हणितलें: ‘‘आता मीं भिक्षा करीनः गोसावियांस अनुसरैनः’’ म्हणौनि मागुति तैसेचि निगालीः तें गोसावियांपासी आलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः अनुसरलीः गोसावी आपुलेनि श्रीकरें झोळीये गाठी घातलियाः तयांचां हातीं दिधलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें झोळी तुम्हां लागे होः’’ तिया ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि झोळी घेतलीः नमस्करिलीः नाथोबा कै आले तें नेणिजेः नाथोबा भिक्षेसि जात होतें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मंडळीकाः यांतें आपणेयां सांगातें भिक्षे नः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग मिरीगावांसि दोघें भिक्षे गेलीं: तयांसि भिक्षे लाडुः मांडेः तुरीः पौळीः धिडरीः भाकरीः दिवसीं: वरणः भातः खीरिः शाकवतियाः ऐसें अवघें आलें: भिक्षा करौनि आलीं: गोसावियांपुढें झोळी दृष्टीपूत केलीः गोसावी डावा श्रीकरू झोळियेंखाली घालूनि ऐसीं उचलिलीः अवलोकिलीः उजवेनी श्रीकरें प्रसाद केलाः मग राणाइसांतें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः इतुकीं अन्नें काइ एकी घरीं असति? पहा पां: नाना पक्वान्नें: एकी घरीं निफजेत?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना जीः इतुकीं काइ निफजेत? एतुकी अन्ने एकी घरा काइसी येति जी? घाटा असे तवं मीठ नाहीः मीठ असे तवं भाजी नाहीं: भाजी असे तवं भाकर नाहीः वरान्न असे तवं तेल नाहीं: मां एतुके पदार्थ तथा पक्वान्ने कैचि जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः निरंतर भिक्षा मागिजे होः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भिक्षा राज्य बाइः मा राज्य काइ कव्हणासि असे?’’ तिया म्हणितलें: ‘‘हे गोसावियांचेनि प्रसादें कीं:’’ गोसावी मानीलें: मग वाटी दिधलीः जेउं सुदलें: जेविलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आपुला भातुः आपुला हातुः आपुले ठेविजेः आपुलें जेविजेः’’ ऐसें गोसावी निरूपण केलें: तियें ‘‘हो कां जीः’’ म्हणौनी श्रीचरणां लागली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. स्वामींचे पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 511
  • Pandhari : चोर कुमती हरणें :।।: / रात्रीं चोर भयनिवृत्ति :।।: पूरीं(पांढरी)
  • गोसावियांसि सांकाळचा पूजावसर जालाः आरोगणाः गुळळाः विडाः पहूड जालाः तें चोरांचें स्थानः रात्री चोर येत होतेः तो गजंबु आइकौनि बाइसीं भक्तिजनी गोसावियांपुढें सांघितलें: ‘‘जी जीः चोर येतातिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः भिया नाः’’ इतुलेनि गोसावी बाहीरि बिजें केलें: पींपळाचेया पारावरि गोसावी उभे राहिलेः आणि गोसावी इखित खांकरिलेः तिहीं भीउनी म्हणितलें: ‘‘एथ बहुत माणुसाचा चाहाळु असेः’’ तैसेचि तें चोर गंगेचिया थडिया थडीयाचि गेलेः गोसावी मढासि बिजें केलें: ऐसीं गोसावी तयाची कुमति हरीलीः मग पहूड स्वीकरिला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. स्वामींचे पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Pandhari : गंगातीरी पूरी महादेवोराया भेटि :।।:
  • उदेयाचि गोसावी भटासमवेत पूरासी बिजें केलें: तेथ रामनायकु नामे ब्राम्हणु त्याचीया घरीं महादेओरावो जन्मला होताः तयाचा घरी गोसावी बीजें केलें: तया बालका दरीसन दिधलें: स्तीति संचरलीः मग बिजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila –
  • Pandhari : भाइदेव विनती स्वीकारू :।।: पूरीं(पांढरी)
  • गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी आसनी उपविष्ट असतिः भ्रिंगीचे सासुरे भाइदेव तें उदेयांचि गोसावियांचिया दरीसना आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: तें रात्रीं चोरांतु होतेः तिहीं पुसिलें: ‘‘जी जीः एथ रात्री माणुसें आलीं होतीं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आलीं होतीं:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘काही उपद्रवो न करीतिचि कीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘न करीतिचिः’’ मग तिहीं गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः गोसावी एथ नसावें: गावां बिजें करावें: हें चोरांचें खांगें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नसिजे तैसें एथ काइ असे?’’ तेही म्हणितलें: ‘‘ना जीः गोसावी एथ नसावें: मिरीगावीं गावांमध्यें नागनाथाचें देउळ असेः तेथ बिजें करावें:’’ तवं मिरीगावीचें नागदेवभटः लाहिभट आलेः तेही गोसावियांसी दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: उपहारालागी विनविलेः गोसावी मानीलेः मग तेही म्हणितलें: ‘‘जी हें चोराचे खांगें: एथ चैगावीचे चोर घेणे घेऊनी येतिः तें एथ वाटीतिः तरी गोसावी एथ नसावें जीः मिरगिावासि बिजें करावे जीः’’ गोसावी विनती स्वीकरिलीः मग तें आज्ञा घेउनि गेलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. स्वामींचे पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Pandhari : पांगरिये लिंगाचां देउळी वसति :॥:
  • गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः गोसावी गंगेचिये थडी वरिलीकडें बिजें केलें: डोणीपासी आलेः उभे राहिलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘डोणी कां सुआना?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः डोणीसि समस्तीं महाजनीं आण वाइली असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें भिक्षु महात्मे यांसि काइसी आणः सुआ डोणीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जीः आम्हां आवलूं नयेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें तुम्हांसि आवलूं लागैलः’’ मग तेही डोणी घातलीं: गोसावी फुटेयाची तळसुती केलीः गोसावी डोणीवरि उभे ठाकलेः बाइसें: लाखाइसें बैसलीं: राणाइसीं बैसावें तवं नावेंक डोणी परती गेलीः मग गोसावी श्रीकरू देउनि राणाइसें डोणीवरि बैसविलीं: मग श्रीकरीं आवला घेउनि डोणी आवलिलीः तें उजूचि नेलीः पेंडी लावलीः मग तयासि विस्मयो जालाः तेहीं म्हणितलें: ‘‘हे काइ जीः ऐसीं डोणी कव्हणी आवलू नेणें जीः जी आमचें जन्म गेलें परि आम्हीही नेवो नेणो जीः कैसी उजुचि नेलीः’’ मग तिहीं आवला हातीं घेतलाः डोणी कडें लाविलीः गोसावी डोणीवरूनि उतरलेः बाइसें उतरलीं: लाखाइसें उतरलीं: अवघीं भक्तिजनें उतरलीं: राणाइसें उतरावीं: तवं डोणी नावेक परती गेलीः मग गोसावी श्रीकरू देउनि राणाइसांतें उतरिलें: तवं बाइसें कोपलीं: ‘‘हें काइ वो जालें रांडेसि? मगा तरि मगां बाबाचां श्रीकर धरूनि चढलीः आतां तरि आतां बाबाचा श्रीकरू धरूनि उतरलीः बाबाचा श्रीकरू दुखवेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि काइसेया कोपतें असा? हें यासीचि करूं आवडत असेः’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्य(अवस्थान) होते. नंतर पुढे स्वामींचे रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मैराळी वरुन पूरीं(पांढरी) येथे आले. ” पूरीं(पांढरी) येथे टेकावरि आसन होतें:” तेव्हाची ही लीळा. त्यानंतर स्वामी पापविनासनीकडे निघाले…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: