Pali (पाली)

पाली, ता. बीड, जि. बीड.


येथील स्थान पाली गावाच्या दक्षिणेला बिंदुसरा नदीचे काठावर खंदोबा मंदीरात सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

पाली हे गाव, बीड सोलापूर राज्यमार्गावर बीडहन दक्षिणेस 9 कि.मी. आहे. व मांजरसुंभ्याहून उत्तरेस 10 कि.मी. आहे. पोहीच्या देवापासून उत्तरेस पाली पायमार्गे (कोळवाडी मार्गे) 7 कि.मी. आहे. पालीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पाली गावाच्या दक्षिण विभागी बिंदुसरा नदीच्या पूर्व काठावर मैराळाच्या (खंडोबाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. आता ओटा तैयार केला आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बीडहून पालीला आले. येथे दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. पहुड, उपहुड झाला व रात्री याच ठिकाणी मुक्काम झाला. (पू. ली. 321, स्था. पो.) प्रात:काळी सर्वज्ञ येथून पोहीकडे गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) देवळाच्या नैर्ऋत्येचे परिश्रय स्थान.


पालीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 321
  • Pali : पाली मैराळीं वसति :॥:
  • गोसावीयांसि उदयाचा पूजावसर जालेयानंतरे गोसावी पालीसि बीजे केले : तेथ गोसावीयांसि दुपाहाराचा पूजावसरः आरोगणाः गुळुळाः विडा जालाः पद्मनाभिदेव बोळवित आले होतेः तयसि गोसावी पाठवनि दिधलीः मग ते आपुलेया गावा गेलेः तेथ गोसावीयांसि मैराळीं वसति जालीः मग प्रभाते बीजे केले :॥:
  • (…. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी बिडला ४ महिने वास्तव्य करुन पालीला आले व पुढे पोहिचादेव-निंबा-पाटवध्याकडे निघाले..)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: