Paithan (पैठण)

येथील स्थाने संपूर्ण. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धातील पहिल्या वेळेच्या 10 महिन्यांच्या वास्तव्यानंतर पैठणहून रिद्धपूरला गेले व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर पैठणहून पिंपळवाडीला गेले.

उत्तरार्धाच्या पहिल्या वेळेच्या काही दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ पैठणहून गावजोगेश्वरीला गेले व दुसऱ्या वेळेच्या बऱ्याच दिवसांच्या वास्तव्यानंतर पैठणहून वृधासंगमला गेले.


अनुपलब्ध स्थान :

(1) भोगावतीच्या घाटी क्षौर करणे स्थान (2) वामदेवाभूत सृष्टी दाखविणे स्थान (3) पापाणजाती निरुपण करणे स्थान (4) सारंगपंडिताच्या आवारातील पहुड स्थान (5) भोगनारायणाच्या पौळीसी ओतपळी घेणे स्थान (6) बाइसा भेटी स्थान (7) राजबीदीसी माहादाश्रमा भेटी स्थान (8) जोगेश्वरीच्या देवळातील आउसा निरुपण करणे स्थान (9) जात्यंधाचे स्थान (10) छर्दोबा दाखविणे स्थान (11) जीव अविद्या विभाग करणे स्थान (12) सकळ शास्त्राचा सिद्धान्त जाणे म्हणणे स्थान (13) भक्ता निब पिपळ दाखविणे स्थान

खालील ठिकाणची चरणचारी स्थाने अनुपलब्ध आहेत.

(14) जखीणीच्या डाउवा उत्तरे (15) लोणार खांडी (16) त्र्यंबका नवचणे (17) कावलापुरीचे वाळवंट (18) ढोरेश्वर जगतीचा पूर्व दारवठा (19) दक्षिण दारवठा (20) नंदीच्या साजेयापाशी (21) साजेया पाशील । स्थान-दर्शन उदका विनियोग स्थान (22) उत्तर भितभंगेसी उभे राहणे (23) वडाच्या झाडाखालील (24) पाच पिंपळ (25) लिंबाखालील (26) सारंगपंडिता ओती श्रीकर देणे. (27) पिंपळेश्वराच्या दक्षिणे वडाच्या झाडाखालील.

खालील ठिकाणची आसन व विहरण स्थाने अनुपलब्ध आहेत. (फक्त देवळांची व ठिकाणांची नावे दिलेली आहेत.)

(28) अमरेश्वर (29) लिंगाचे देऊळ (30) सिद्धनाथ (31) पिंपळाच्या झाडाखालील (32) चास (33) भोगावतीची पटीशाळा (34) भोगावतीच्या घाटावरील लिंबाच्या झाडाखालील (35) महालक्ष्मी (36) एकवीरा (37) विनायक (38) रामनाथाची पश्चिम सोंडी (39) वैजनाथ (40) सारंगपंडिताच्या घरी देव्हारचौकी (41) भोगनारायणाची उत्तर सोंडी (42) भोगनारायणाची पटीशाळा (43) काप्टाचा शास्त्रमढ पश्चिम सोंडी (44) नरसिंह मढ (45) पार्वती सोमनाथ (46) नागाराउळाची गुंफा (47) पुरषोत्तम देवाची गुंफा (48, 49, 50, 51) बोडणवावीच्या चारी पटीशाळा (52) भैरवाचे देऊळ (53) छायागोपाळ (54) जनार्दन (55) निंबादैत्य (56) मल्लीनाथ (57) गोपाळ (58) मुक्तेश्वर (59) प्रागमढ (60, 61, 62, 63, 64) पाच नागदेवळ्या (65) माएधुवाचा आवार (66) शंकरमढ (67) हेडाउ मठ (68) हेडाउ मठाशेजारील दुसरा मठ (69) प्रज्ञासागराची गुंफा (70) चिंचाए (71) चिंचायेच्या घाटी सोंडी (72) चिंचायेची पटीशाळा (73) चिंचायेच्या देवळाची उत्तर सोंडी (74) ओंकार मांधाता (75) चांगदेव (76) चांगदेव देवळाची माडी (77) चांगदेव देवळाच्या आडवांगी न्हाणी (78) चांगदेव देवळातील बाळाणे (79) कामाक्षा (80) लिंगाचे देऊळ (81) रवळमठाची पटीशाळा (82) खळमठाचे अंगण (83) मुधादैत्य (84) मुधादैत्याची पटीशाळा (85) पिंपळमढ (86) पिंपळमढाची उत्तर सोंडी (87, 88, 89) पिंपळ मढाच्या तिन्ही पटीशाळा (90) ब्रह्मचारीदेवाची गुंफा (91) पूर्वाभिमुख राघवमढ (92) उत्तराभिमुख राघवमढ (93) वशिष्ट देवाचा मढ (94) व-हारदेव (95) दस्वमेध (96) सप्तमात्राचा चौक (97) सप्तमात्रेच्या जगतीमधील लिंगाचे देऊळ (98) गणेश (99) हयगर्वाच्या देऊळी नासीसी आडदांडी (100) आश्विनदेवाची गुंफा (101) हयगर्वदेवाची गुंफा (102) खंडनाथ (103) सिद्धनाथ (104) लोणार खांडी रिंगता उजव्या हाताची सोंडी (105) लोणारेश्वर (106) कावळेश्वर (107) ढोरेश्वराचा भिडी आसन (108.109) ढोरेश्वराची उत्तर व दक्षिण सोंडी (110) बाळाणा (111) दक्षिण ओटा (112) नंदीचा साजा (113) वनदेव (114) ढोरेश्वराच्या पौळी पश्चिमेचा पिंपळ (115) नारायण (116) आडाच्या पश्चिमेची थडी (117) पार्वती जखीणीचा देऊळी नासी (118) तेथीलच लिंगाचे देऊळ (119) एकवीरा (120) लिंगाचे थडे (121) घाट माथाचा पिंपळ पूर्वील पालवी (122) अग्नीष्टिका (123) गुप्त मल्लीनाथ (124) पिंपळेश्वर (125) कमळेश्वर (126) पारावरील पिंपळ (127) पापविनाशनी (128) चक्रपाणी (129) चक्रतीर्थी कारटक्रिया खडक (130) गंगेच्या थडीची काटी (131) गणेश देवळाची दक्षिण सोंडी (132) रहाटगाव मार्गीचा चास (133) गणपतमढा पुढील साजा (134) गणपतमढाची पटीशाळा (135, 136) मढाची पूर्व-पश्चिम सोंडी (137) आतील पटीशाळा (138) माइतेयाहरीच्या आवारातील पटीशाळा (139) उपरीवरील आसन (140) गणपतमढा पुढील बोडणवावीचा ओटा (141) गर्गनारायण (142) केदाराच्या पश्चिमेचा लिंब (143) के दाराच्या दक्षिणेचा ओहळ, तेथे डांगरेशापाशी आसन (144) भीड सारू घाटाचा चौक (145) पश्चिम पौळीची पटीशाळा (146) पुढील ताडाखालील आसन (147) पीठजय (148) वामदेवाच्या गुंफेतील ओटा (149) कवाडा आड आसन (150) शंकरेश्वराच्या देवळाची नासी (151) उग्रादैत्य (152) म्हाळसा (153) त्या उत्तरेच्या अंगणातील पिंपळ (154) पिंपळाच्या पश्चिमेचे आसन (155) आनकइ (156) चक्रतीर्थ (157) पोटफोडा (158) ढोरेश्वराच्या घाटी म्हाळसे पश्चिमे वाटेसीची आसन (159) चौबारा.

मर्दना व मादने स्थानाची ठिकाणे : (160) सारंगपंडिताचा आवार (161) माळवधावरील कापड मादने (162) भोगनारायणाचे अंगण (163, 164) माएधुवाचा आवार (165) गणेशाच्या देवळाचे अंगण (166) ढोरेश्वराचे अंगण (167) गणपतमढावरील चौरंगावरील सोमपर्वाचे मादने (168) गणपतमढाचे अंगण (169) गणपतमढाची बोडणवावीची सोंडी (170) सप्तमात्रेचे देऊळ, उंबऱ्याच्या आतील मादने
पूजा आरोगणेच्या स्थानाची ठिकाणे : (171) सारंगपंडिताचा आवार (172) माएधुवाचा आवार (173) माइतेया हरीचा आवार | (174) गणपतमढ (175) कारटक्रिया खडक

वेढे स्थानाची ठिकाणे :

(176) गणेशाचे देऊळ, दक्षिण विभागी (177, 178) गणपत मढाची पटीशाळा व अंगण

अवस्थानाची ठिकाणे :

(179) नागनाथ (180) चिंचाए (181) काळीका (182) रवळमठ (183) सप्तमात्रा (184,185, 186, 187) ढोरेश्वरी माझारीले चौकी चहकोनी चारी
ओटे अवस्थानाचे (188) त्रीपुरुष (येथे पूर्वार्धात वसती) (189) गणपतमढ (190) भैरवाचे देऊळ.

काही इतर स्थाने :

(191) सारंगपंडिताच्या आवाराच्या पूर्वेस परिश्रय स्थान (192) छायागोपाळाच्या देवळाच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान (193) नागनाथाच्या ईशान्येचे परिश्रय स्थान (194) ढोरेश्वराच्या उत्तर दारवठ्याच्या ईशान्येचे परिश्रय स्थान (195) माइतेया हरीच्या आवारी अंगणी चरण क्षाळण स्थान.


पैठणची एकूण स्थाने : 211


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: