Pachora (पाचोरा)

पाचोरा, ता.पाचोरा जि.जळगांव


येथील 1 स्थान - हे स्थान पाचोरा शहराच्या जुन्या जामनेर मार्गावर गावातच हिवरा नदीच्या काठावरील भारत बिल्डींगच्या मागे लहान मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

पाचोरा हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस 49 कि.मी. आहे व जामनेरहून नैर्ऋत्येस 59 कि.मी. आहे. भडगाव ते पाचोरा 14 कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील पाचोरा हे जंक्शन आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पाचोरा शहरातील जुन्या जामनेर रस्त्यावरील भारत बिल्डिंगच्या पाठीमागे हिवरा नदीच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भडगावहून पाचोऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 409, स्था.पो.उ.प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून शेंदुर्णीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पाचोरा चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 409
  • Pachora : पाचौरीं कमलेश्वरीं वसतिः पांगुळेया पाय देने :॥:
  • उदयाचा पूजावसरु जाल्यायानंतरे गोसावी पाचौरेयासि बीजें केलेंः गावापस्चिमे नदीचिये थडिये कमळेश्वराचे देउळः तेथ चौकी गोसावीयांसि आसन जालेः उदयाचा पूजावसरु जाल्यायानंतरे तवं गावातुनि पांगुळ ब्राम्हण एकु गोसावीयांचेया दर्शनासि आलाः श्रीचरणावरी माथा ठेविलाः तवं तयासि स्थिती जालीः पुढा बैसलाः मग स्तवन करौनि विनविलेंः मज पय देइजो जीः सर्वज्ञें म्हणीतलेः ऐसे उभे राहाः आणि पैलावरिला कलशासि हात लावाः हो का जीः म्हणौनि उठौनि कलशा हातु लाविलाः आणि आनंदभरितु जालाः मग साष्टांग दंडवतें घालौनि श्रीचरणा लागलाः मग धावतु गावांतु गेला :॥: (टिप – येथे हे पहील्यांदा येने.. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी कनाशीला आले तेथ वास्त्व्य झाले. त्यानंतर स्वामी भडगावला आले येथे तीन दिवस थांबले व भडेगाववरुण पाचोर्याला आले. वास्त्व्य(अवस्थान)काळ अद्यात…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: