Niphad (निफाड)

निफाड, ता.निफाड जि. नाशिक


येथे 4+3=7 स्थाने आहेत - निफाड गावाच्या अकोलखास भागात रोडवरच मंदीर आहे. या मंदीरात 4 स्थाने आहेत. 1 स्थान नदीपलीकडे जवळच आहे. 
1 स्थान पुलाच्या पलीकडे गावाच्या वायव्येकडे कुलकर्णी यांचे शेतात मंदीर आहे. 
1 स्थान निफाड गावाच्या आग्नेयेकडे 1.50 की.मी. वर कापसे यांचे शेतात मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

निफाड हे गाव, येवला-नाशिक मार्गावर येवल्याहून किंचित् वायव्येस 44 कि.मी. आहे. व नाशिकहून किंचित् ईशान्येस 40 कि.मी. आहे. विंचूर ते निफाड 15 कि.मी. सुकेणे ते निफाड (साखर कारखाना मार्गे) 15 कि.मी. व पिंपळस मार्गे 10 कि.मी. मुंबई-भुसावळ लोहमार्गावरील नाशिक-मनमाड मधील निफाड हे रेल्वेस्थानक आहे. निफाड रेल्वे स्थानक ते निफाडगाव 5 कि.मी. आहे तसेच निफाड येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान निफाड गावातील अकोलखास विभागात निफाड स्टेशनरोडच्या पूर्वेस पुलाजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंह मढ होता. त्या मढ़ातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभ आपल्या परिभ्रमणाच्या पर्वाध काळात सुकेण्याहून निफाडला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 111, तु. प्र., स्था. पो.)

अवस्थान स्थानाच्या ईशान्येचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (स्थान क्रमांक 1 ते 4)

2. आसन स्थान :

हे स्थान निर्देशरहित स्थानापासून उत्तरेस 7 फूट अंतरावर आहे. हे नरसिंह मढाच्या पटीशाळेवरील स्थान होय. (वि. स्था. पो. क्र. 1625)


3. मादने स्थान :

हे स्थान मंदिराच्या बाहेर उत्तर बाजूस देवळात आहे. (स्था. पो.)


4. जगतीच्या दारवठ्यातील स्थान :

हे स्थान मादने स्थानाच्या ईशान्येस देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे चरणचारी उभे राहत. (स्था. पो.)


5. अवस्थान स्थान :

हे स्थान वडाळी नदीच्या पश्चिम काठावर देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे कोंकणाइ देवीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सुकेण्याहून आल्यावर प्रथम त्यांना या ठिकाणी आसन झाले. मग येथून डखले यांना बि-हाड पाहण्यासाठी पाठविले. (पू.ली. 265, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

6. आसन स्थान :

हे स्थान वडाळी नदीच्या पलीकडे निफाड स्टेशनरोडच्या पूर्वेस श्री. नंदू लक्ष्मण कुलकर्णी यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. (पू.ली. 262 ख.प्र.,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. मार्गी आसन स्थान :

हे स्थान निफाड गावाच्या आग्नेयेस 1 कि.मी. अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या उत्तरेस श्री. किसन आवाजी कापसे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे. निफाड औरंगाबाद हायवे वर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी रस्ता असुन पंपापासुन 1 कि.मी. स्थान आहे. या स्थानापासून आग्नेयेस दीड कि.मी. अंतरावर शिवरे येथील आसन स्थान आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू निफाडहुन नांदुरला जात असताना येथे असलेल्या काटेरी झाडाखाली त्यांना आसन झाले. या ठिकाणी पूजा, आरोगणा, गुळळा, विडा, पहुड, उपहुड झाला. (पू. ली. 111 तु. प्र., स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. नरसिंह मढाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान.

2. दोनी मढाच्या संदींतील लघु परिश्रय स्थान.

3. संगमेश्वरी आसन स्थान.

4. महालक्ष्मीचा देऊळी आसन स्थान.

5. नारायणमढाच्या पटीशाळेवरील


निफाडची एकूण स्थाने : 12


  • Purvardha Charitra Lila – 265
  • Niphad : निफाडे अवस्थान :।।: / निफाडे आत्मेयारामां पयोवर्त देणें :।।:
  • आत्मेयारामा पयोव्रत देणें गोसावी निफाडेयासि बिजें केलें: तियांची कोकणाये आसन जालें: तेथचि दुपाहाराचा पूजावसर आरोगणा जालीः गुळळा विडाः पहूडः उपहूड जालाः मग तेथौनि डखले बिढार पाहो पाठविलेः तें नारायणमढासि गेलेः मढु पाहिलाः तवं तेथ लिंगाचां देउळीं एक संन्यासी बैसले होतेः तेही डखलेयांतें पुसिलें: ‘‘तुम्हीं कव्हण?’’ डखलां सांगितलें: ‘‘आम्ही श्रीचांगदेवराऊळा गोसावियांचें:’’ तिहीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं एथ कां आलेति?’’ डखलां सांगितलें: ‘‘ना आमतें गोसावी बिढार पाहों पाठविलें असेः’’ तेही म्हणितलें: ‘‘गोसावी या पापीयांचेया गावां कां आलेति? मीं पयोव्रती आत्मारामः भुका आरोळिया देतु असें: तीनि दिवस उपवासीः परि कोण्ही पयोव्रत नेदीतिः’’ मग डखलां बिढार पाहिलें: गोसावियांपासी आलेः अवघें सांघितलें: ‘‘जी मढ बरवा असेः तेथ एक आत्माराम नावें भुका आरोळीया देत असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गा डखलेयाः आत्माराम ऐसें नांव आणि भुका आरोळीया देतिः हें अतिविरूद्ध कीः’’ ऐसें वेळा दोनि म्हणितलें: मग गोसावी नारायणमढां बिजें केलें: मढोचए पटिशाळे तेथ गोसावियांसि आसन जालें: तवं तें गोसावियांतें देखौनि अधिकाचि आरोळिया देवों लागलेः गोसावी बाइसातें पुसिलें: ‘‘बाइः हें कव्हण?’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः हें वामदेवांचे प्रथम शिक्ष्य आत्मारामः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यांसि पयोव्रत वोपाः’’ डखलां म्हणितलें: ‘‘यासि पयोव्रत काइसें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एर्‍हवीं बाइसां निरोध कीं गाः’’ मग बाइसीं एका दामाचें दिधलें: तेथ दिस पाच अवस्थान जालें: कदाचित विहरणा बिजें करीतिः तेथ रामनाथी नरसिंही आसन होएः संगमेस्वरीं आसन होए :।।:
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां वरुण निफाड येथे आले व स्वामीचे येथे पाच दिवस अवस्थान होते.)
  • Purvardha Charitra Lila – 266
  • Niphad : मार्गी आसनः प्रातःपूजा आरोगणा :।।: निफाड नांदौर रस्ता
  • गोसावी निफाडेहुनि बिजें केलें: मार्गी गोसावियांसि कांटियेतळीं आसन जालें: पूजा जालीः दूधकरंबेयाचि आरोगणा जाली :।।:
  • (टिप : निफाड व शिवरे यांचे मधे ही लीळा झाली आहे.)
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां वरुण निफाड येथे आले व स्वामीचे निफाड येथे पाच दिवस अवस्थान होते. पुढे स्वामि नांदौरकडे निघाले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: