Nillod (निल्लोड)

निल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान निल्लोड गावाच्या पूर्वेकडे गावालगतच नदीच्या काठावरील मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

निल्लोड हे गाव, औरंगाबाद जळगाव मार्गावरील निल्लोड फाट्यापासून पूर्वेस 2 कि.मी. आहे. (1) सिल्लोड ते निल्लोड फाटा 10 कि.मी. (2) फुलंब्री ते निल्लोड फाटा 25 कि.मी. निल्लोडला जाण्यासाठी सिल्लोडहून एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान निल्लोड गावापासन पूर्वेस एक कि.मी. अंतरावर बोरगाव रस्त्यावर नदीच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात करंजखेडहून निल्लोडला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 456, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून दाभाडीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


येथील बाकीची चार स्थाने निर्देशरहित आहेत.


निल्लोडचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Nillod : नेलवाडे वसति :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने…विसृत लीळा नाही. लीळेची एवढीच आदी चरीत्रात आढळते… स्वामींच्या आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोडवरुन पूढे आन्व्याकडे जाताना निल्लोड येथे स्वामी वसतिस थांबले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nillod : रामतिर्थी वसति :॥:
  • तेथौनी गोसावी नेलवाडेंसि रामतिर्थासि बीजें केलेंः रामतिर्थी वसति जाली :॥:
  • (टिप – येथे स्वामी दुसर्‍यांदा आले… येथील लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)कडे निघाले तेव्हा निल्लोड येथे वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: