Newargaon (नेवरगाव)

नेवरगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथे 7 स्थाने आहेत - 7 ही स्थाने जुन्या नेवरगांव गावाच्या नैऋत्येकडे भव्य मंदीरात व मंदीर परीसरात आहेत


जाण्याचा मार्ग :

गंगापूरहून जुने नेवरगाव (गंगापूर साखर कारखाना मार्गे) 17 कि.मी. आहे व वाहेगाव मार्गे 23 कि.मी. आहे. सुरेगावहून वायव्येस नेवरगाव पायमार्गे दीड कि.मी. आहे. नवीन नेवरगावपर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवीन नेवरगाव ते जुने नेवरगाव 5 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान जुन्या नेवरगावच्या नैर्ऋत्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गदोनायकांचा भव्य वाडा होता.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून नेवरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते. त्यानंतर ते येथन परत डोंबेग्रामला गेले. (उ. ली. 219, स्था. पा.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या नैर्ऋत्य बाजूस आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानपासून पूर्वेस 1 फूट 3 इंच अंतरावर आहे.
लीळा : गदोनायकांनी येथे सर्वज्ञांची रत्न अलंकारांनी पूजा केली. त्यावेळी गदोनायकांनी सर्वज्ञांना विचारले, “माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य आहे, तर त्या द्रव्यामुळे मला परमेश्वर प्राप्त होईल?” यावर सर्वज्ञांनी, द्रव्यादी भजनांनी परमेश्वर प्राप्त होत नाही, याविषयी गदोनायकांना निरूपण केले. (उ. ली. 301)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. उत्तर बाळाणा आसन स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस 3 फूट 2 इंच अंतरावर आहे. (स्था, पो. उ. प्र. वि. स्था. पो. क्र. 892)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. दक्षिण बाळाणा आसन स्थान :

हे स्थान उत्तर बाळाणा आसन स्थानापासून दक्षिणेस 1 फूट 6 इंच अंतरावर आहे. (स्था. पो, उ. प्र., वि. स्था. पो. क्र. 892)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. आडदांडीपाशील मर्दना स्थान :

हे स्थान दक्षिण बाळाणा आसन स्थानापासून दक्षिणेस 4 फूट 11 इंच अंतरावर आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानाच्या पूर्वेस देवळातच आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


बाहेरील लहान देवळातील दोन स्थाने निर्देशरहित आहेत.


अनुपलब्ध स्थान :

(1) धाएखडकी आसन स्थान.

(2) लघुपरिश्रय स्थान.

(3) गदोनायकांच्या आवाराच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान.

(4) पश्चिमेचे परिश्रय स्थान.

(5) शंखनाथाच्या देवळातील आसन स्थान.

(6) सिद्धनाथाच्या देवळातील आसन स्थान.

(7) गणेशाच्या देवळातील आसन स्थान.

(8) अग्नीष्टिका आसन स्थान.

(9) एकवीरेच्या देवळातील आसन स्थान.


नेवरगावची एकूण स्थाने : 16


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: