Nevasa (नेवासा)

रा, ता. ?, जि. अहमदनगर


येथे 2+1 स्थाने आहेत - ही स्थाने जुन्या नेवासा गावाच्या उत्तरेकडे ज्ञानेश्वर मंदिरापासून पुरातत्व विभागाच्या लोखंडी फाटकातुन आत 1 कि.मी. पायी अंतरावर, प्रवरा नदीच्या काठावर, सध्या खुल्या परीसरात आहेत. व्यवस्थापनाला भिक्षुक आहेत.

(येथे आमच्या स्वामिंनी 25 च्या वर लीळा केलेल्या आहेत. तथापी 3 सोडुन सर्वच स्थाने अनुपलब्ध आहेत.)


जाण्याचा मार्ग :

नेवासा हे गाव, अहमदनगर औरंगाबाद मार्गावरील नेवासा फाट्यापासून वायव्येस 5 कि. मी. आहे. (1) अहमदनगर ते नेवासा 60 कि. मी. (2) औरंगाबाद ते नेवासा 58 कि. मी. (3) शेवगाव ते नेवासा 40 कि, मी. (4) गंगापूर ते नेवासा 24 कि. मी. (5) श्रीरामपूर ते नेवासा 32 कि. मी. नेवासा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान ज्ञानेश्वर मंदिराच्या उत्तरेस दोन फर्नांग अंतरावर लाडमोड टेकडी विभागात प्रवरा नदीच्या दक्षिण काठावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पुरादित्याचे देऊळ होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून नेवाशाला आले. त्यांचे या ठिकाणी चार महिने वास्तव्य होते. (स्था. पो.) चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते येथून रांजणगावला गेले.

येथील इतर लीळा : (1) गोळकहोडे भटां पराजयो करणे. (उ. ली. 225)

(2) पास निरुपण. (उ. ली. 236)

(3) भटां होडे केळे खाववणे, (उ.ली. 239)

(4) मार्कंडाची लाडू चोरी प्रगट करणे. (उ. ली. 241)

(5) अनो सीखा सूत्रत्याग प्रशंसा. (उ. ली. 245)

(6) भटां केसतोडा पाणीकापड बांधवणे. (उ.ली. 246)

(7) म्हाळसा दर्शना येणे. (उ. ली. 247)

(8) भटोबासांना ज्ञान, भक्ती, वैराग्य निरुपणे. (उ. ली. 253)

(9) प्रयाण अवस्वरी देवा दीनदान प्रश्नु. (उ. ली. 255)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. पुरादित्याच्या चौकी आसन स्थान.

2. पुरादित्याच्या अंगणी मादने स्थान.

3. पटीशाळेवरील आसन स्थान.

4. पुरादित्या पश्चिमे आसन स्थान.

5. नारायणाचा मढी आसन स्थान

6. बडव्याच्या घरी आसन स्थान.

7. परिश्रय स्थान.

8. गोपाळाचा देऊळी विहरण स्थान.

9. सुंदराचा देऊळी आसन स्थान.

10. कपाळेश्वराचा देऊळी आसन स्थान.

11. वराहदेवाचा देऊळी आसन स्थान.

12. म्हाळसेचा देऊळी आसन स्थान.

13. दक्षिण दारवठा तीन खणांची माडी, मधल्या खणी आसन स्थान.

14. घाटी आसन स्थान.

15. कणे रेश्वरी आसन स्थान.

16. कमळेश्वरी आसन स्थान.

17. मार्कंडाची चोरी प्रगट करणे स्थान.


डोंबेग्राम ते नेवासा मार्गीची अनुपलब्ध स्थान :

1. चौबारा आसन स्थान.

2.चौबारा गणेश, त्या गणेशाच्या अंगणा दक्षिणे आड, तो दृष्टी अवलोकणे.


नेवाशाची एकूण स्थाने : 18


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: