Nepti (नेप्ती)

नेप्ती, ता. जि. अहमदनगर


हे स्थान नेप्ती गावाच्या पश्चिमेकडे कांडेकर गल्लीत मंदीर आहे. या मंदीरात 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

नेप्ती हे गाव, अहमदनगरच्या पश्चिमेस नगर-कल्याण मार्गावरील नेप्ती फाट्यापासून 2 कि.मी. आहे. अहमदनगर ते नेप्ती फाटा 4 कि.मी. आहे व जामगावहून नेप्ती फाटा 22 कि.मी. आहे. अहमदनगरहून नेप्ती फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. जामगावहून ईशान्येस नेप्ती (दैठण गुंजाळ, हिवरेबाजार, निमगाव मार्गे ) 16 कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे. नेप्ती येथे तीर्थयात्रेकरुंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान नेप्ती गावाच्या पश्चिम विभागी कांडेकर गल्लीत पूर्वाभिमुख देवळात आहे. आज हे देऊळ, ‘गोपाल कृष्ण मंदिर’ या नावाने ओळखले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे अनंतेश्वराचे देऊळ होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात भिंगारहून नेप्तीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ.ली. 284, स्था.पो.) त्यानंतर ते येथून पारनेरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळासमोरील स्थान निर्देशरहित आहे.


नेप्तीचे स्थान :1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: