Navgaon (नवगाव)

नवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद


येथील 5 स्थाने - नवगांव येथे एकाच ठीकाणी 5 स्थाने आहेत. नवगांव गावाच्या इशान्येकडे 2 कि.मी. अंतरावर विंझुगा नदीच्या काठावर नवीन मंदीरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

नवगाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस 16 कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस 25 कि.मी. आहे. मायगाव ते नवगाव 6 कि.मी. मायगाव ते नवगाव पायमार्गे 4 कि. मी. नवगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. गावामध्ये महानुभाव मठ आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान नवगावच्या ईशान्येस चार फलाँग अंतरावर येरभद्रा (विंझुगा) नदीच्या काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील दक्षिण भिंतीलगतचे हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात आंगलेगव्हाणहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. 20 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून मायगावला गेले. (पू. ली. 557, स्था. पो.)

येथील इतर लीळा : 1) ब्राह्मणाला स्थिती देणे. (पू. ली.560)

2) ब्राह्मणास स्थिती जाण्यास उपाय सांगणे. (पू. ली. 561)

3) सापाचे उतटणे करणे. (पू.ली.562)

4)मार्कंडालापांचाळेश्वरलापाठविणे. (पू.ली.563)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून वायव्येस 9 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ आंगलेगव्हाणहून आल्यानंतर देवळाच्या चौकात येथे चरणचारी उभे राहिले. त्यांना ओटा करण्याची प्रवृत्ती होती. ती जाणून भक्तजनांनी ओटा तयार केला. नंतर सर्वज्ञांना ओट्यावर आसन झाले. तो पर्यंत ते येथेच उभे होते. (पू. ली. 557)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. ब्रह्मप्रकाशिका कथन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस 5 फूट 7 इंच अंतरावर आहे. आदित्याचे देऊळ व महालक्ष्मीचे देऊळ या दोन देवळांच्या संदीतील हे स्थान होय.

लीळा : 1) एक अवधूत दोन देवळांच्या संदीमध्ये भांग भाजत होता. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. अवधूताला म्हणाले, ‘आपण काय ब्रह्मप्रकाशिका भाजत आहात?” अवधूत म्हणाला, ”हो जी. ” मग सर्वज्ञांना येथे उकड आसन झाले. (पू. ली. 558, स्था. पो.)

2) सर्वज्ञांच्यापासून येथे इंद्रभटांना स्थिती झाली. (पू. ली. 558)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. राणाइसा क्षेमालिंगन देणे स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपात आहे. महालक्ष्मीच्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय..

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे राणाइसाला क्षेमालिंगन दिले. (पू.ली.564)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. आसन स्थान :

हे स्थान राणाइसा क्षेमालिंगन देणे स्थानापासून पूर्वेस 24 फूट 3 इंच अंतरावर पश्चिमाभिमुख पडवीत आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथे नवगावातील एका ब्राह्मणाच्या दहीभाताच्या आरोगणेच्या विनंतीचा स्वीकार केला. (पू. ली. 566)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) आदित्याच्या अंगणातील मादने स्थान.

2) पिंगळे प्रशंसा स्थान.

3) परिश्रय स्थान.

4) ओहळी राणाइसा लाखाइसा भेटी स्थान.

5) ब्राह्मणाच्या घरातील आसन स्थान.

6) वनदेवाच्या देवळातील विहरण स्थान.

7) ब्रह्मनाथाच्या देवळातील विहरण स्थान.


नवगावची एकूण स्थाने : 12


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: