Naur (नाऊर)

नाऊर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - नाऊर गांवापासून 1 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

नाऊर हे गाव, श्रीरामपूर – वैजापूर मार्गावर श्रीरामपूरहून उत्तरेस 20 कि.मी. आहे व वैजापरहून दक्षिणेस 21 कि.मी. आहे. नायगावहून पर्वेस नाऊर पायमार्गे 3 कि.मी. आहे. नाऊरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. नाऊर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान नाऊर गावाच्या नैर्ऋत्येस अर्धा फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे कंटकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नायगावहून नाऊरला आले. येथे दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली व रात्री येथेच मुक्काम झाला. (पू. ली. 285 ख. प्र., स्था, पो.)

दुसऱ्या दिवशी ते येथून पुणतांब्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. अग्नीष्टिके क्षौर करणे स्थान.
2. अग्नीष्टिके जवळील मादने स्थान.
3. परिश्रय स्थान.


नाऊरची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 279
  • Naur : नाउरी कंटकेश्वरीं वसतिः अग्निष्टिके क्षेउर :॥:
  • गोसावी नाउरासि बीजे केलेः गोसावियांचे क्षौर जाले होतेः तवं नापिकु एकु आलाः नमस्कार करौनि तेणें अग्निष्टिकेसि गोसावियांचे कुशळता क्षौर केलेः गोसावी बाइसाकरवि तया वारिकासि दाम एक देवविलाः मग बाइसीं दायंबाकरवी गोसावियांसी मर्दना देवविलीः मार्जने जालेः गोसावी गावांपस्चिमे कंटकेश्वरीं बीजे केलेः तेथ दुपाहाराचा पूजावसरु जालाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः पहुड उपहुड जालाः तेथ वसति जाली :॥:
  • (.. येथे हे दुसर्यांदा येने. स्वामी नासिक-नांदौर-कुंकुमठाण-पुणतांबा-नायगाववरुण आले व पुन्हा वापस पुणतांब्याकडे निघाले.)
  • Purvardha Charitra Lila –
  • Naur : नाउरीं कंटकेश्वरीं वसति :॥:
  • (…येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे :॥: येथे हे पहील्यांदा येने. स्वामी वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला वरुण आले व सिन्नरकडे निघाले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: