Narayandoha (नारायणडोह)

नारायणडोह, ता. जि. अहमदनगर


नारायनडोह गांवाच्या पूर्वेकडे 200 मीटर अंतरावर सरोळा रोडच्या दक्षिणेकडे मंदीर आहे. येथे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

नारायणडोह हे गाव, अहमदनगर-जामखेड (मांडवा मार्गे) मार्गावर नगरहून आग्नेयेस 10 कि. मी. आहे. तसेच नगर-बीड मार्गावरील सारोळा गावापासून नैर्ऋत्येस 2 कि. मी. आहे. नगर ते सारोळा 10 कि. मी. व चिंचोडी ते सारोळा 10 कि. मी. चिचोंडीहून पश्चिमेस नारायणडोह (सांडवे, उक्कडगाव मार्गे) 10 कि. मी. आहे. हा पायमार्ग होय. नारायणडोह येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. नारायणडोहला जाण्यासाठी नगरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान नारायणडोह गावाच्या पूर्वेस 200 मीटर अंतरावर सारोळा रस्त्याच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात मांडवगणहून नारायणडोहला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 275, स्था. पो. शा. खा. द. प्रत) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून अरणगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


नारायणडोहचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: