Nanori (नानोरी)

नानोरी, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


नानोरी येथील 2 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) 2 ठीकाणी आहेत - येथील 1 स्थान गावातच पूर्वेकडे मंदीर आहे. तर 1 स्थान गावातच ग्रामपंचयतीजवळ मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

माधानहुन आग्नेयेस नानोरी पायमार्गे 3 कि.मी. आहे. चांदूरबाजारहून उत्तरेस नानोरी 3 कि.मी. आहे. माधान ते नानोरी (चांदूरबाजार मार्गे) 10 कि.मी. आहे. नानोरीला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. देवता प्रतिमांशी खेळ करणे स्थान :

हे स्थान नानोरी गावाच्या पूर्वेस गावा लगतच उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे देवता प्रतिमांशी खेळ केला. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. दांडी खालाविणे स्थान :

हे स्थान पूर्व माध्यमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आहे.

लीळा : पूर्वी येथे वडाचे झाड होते. श्रीगोविंदप्रभुंनी या ठिकाणी पालखी थांबवून वडाच्या झाडाखालील देवता प्रतिमांशी खेळ केला. (स्था.पो.उ.प्र.)


3. विहीर अवलोकणे स्थान :

हे स्थान दांडी खालाविणे स्थान मंदिर च्या बाजूला आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील दोनही स्थान


नानोरीची एकूण स्थाने : 3




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: