Nandgaon Peth (नांदगाव पेठ)

नांदगाव (पेठ) ता. जि. अमरावती


नांदगांव(पेठ) येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) नांदगांव(पेठ) गावात मध्यभागी मारवडीपूर्यात आहे. व हाईवे च्या दुसऱ्या बाजूला एक महानुभाव आश्रम सुद्धा आहे


जाण्याचा मार्ग :

नांदगाव, अमरावती नागपूर मार्गावर रहाटगावहन ईशान्येस 8 कि.मी. आहे. अमरावती ते नांदगाव 13 कि. मी. तिवसा ते नांदगाव 28 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. श्रीगोविंदप्रभूचे पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान नांदगावातील मारवाडीपुरा विभागात श्री. राधाकिसन जयकिशोर सारडा यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात लिंबाच्या झाडाखाली देवळात आहे. श्रीगोविंदप्रभूच्या वेळी येथे कडतभटांचा आवार होता. त्या आवारातील हे स्थान होय.

लीळा: श्रीगोविंदप्रभू काटसुरहुन नांदगावला आले. त्यांना दुर्गामध्ये देव्हारचौकी तीन दिवस अवस्थान झाले. एके दिवशी श्रीप्रभूना येथे पूजा आरोगणा झाली. (भी. प्रत, लीळा 208,स्था. पो.) तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून अंजनगावबारीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


महानुभाव आश्रम नांदगाव पेठ Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने:

1. दुर्गातील देव्हारचौकी अवस्थान स्थान.

2. कृष्णभटांच्या आवारातील मर्दना स्थान.

3. मादने स्थान.

4. पूजा आरोगणा स्थान.

5. विष्णभटांच्या आवारातील मर्दना स्थान.

6. मादने स्थान.

7. पूजा आरोगणा स्थान.

8. भानवसाच्या अंगणीचा आड अवलोकणे स्थान.

9. वडाच्या झाडाखालील आसन स्थान.

10. वडजंबेसी खेळ करणे स्थान.

11. खांडशाळेआसन स्थान.

12. जगतीआंतुल आड अवलोकणे स्थान

14. कडतभटांच्या आवारातील मर्दना स्थान.

15. मादने स्थान.


नांदगावची एकूण स्थाने : 16


  • Govind Prabhu Charitra Lila – 232
  • Nandgaon Peth : नांदिगांवी अवस्थांन :॥
  • मग गोसावी नदिगांवासि बीजे केलें: ठाकुर साउमें आले : दंडवत घातलं : श्रीचरणा लागले : मग गोसावियति वीनवीलें : मग गोसांवीं वीनत्रणी स्वीकरीली : मग भातरि बीजें केलें : मग देव्हार-चौकीय अवस्थान दीस तीन जालें. मग गोमावियासि पडदर्णी वळगवीली : मग मना मादणे जालें : पुजा जाली : वस्त्र वोळगवीलें : मग आरोगणा जाली : पहुडु जाला : ऐसें तीघा भाउवाची घरी तीन दीस वस्त्रपुजा : आरोगण। जाली: तानिचि दी अवस्थान: मग बीजें केलें ॥२३२॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: