Naleshwar (नाळेश्वर)

नाळेश्वर ता.जि. नांदेड


नाळेश्वर स्थानावर जान्यासाठी गोपाळचावडी मंदीरापासुन 1 की.मी.गेल्यावर लिंबगाव-नाळेश्वर रोडचे थोड्याचअंतरावर मंदीर आहे. येथुन जीपने जाने शक्य आहे.

येथील 1 स्थान - नाळेश्वर येथे मोठे मंदीर आहे. (नाळेश्वर गाव व नाळेश्वर स्थान वेगवेगळे आहेत)


जाण्याचा मार्ग :

नाळेश्वर हे गाव, नांदेडहन 11 कि.मी. आहे. नाळेश्वर गाव ते नाळेश्वरचे स्थान 1 कि.मी. लिंबगाव ते नाळेश्वर चे स्थान 3 कि.मी. नाळेश्वरच्या स्थानापाशी तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. नाळेश्वरला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन तथा संन्याशास स्थिती देणे स्थान :


हे स्थान गोपाळचावडीपासून आग्नेयेस 1 कि.मी. अंतरावर नाळेश्वर गावाच्या हद्दीत लिंबगाव ते नाळेश्वर या कच्च्या सडकेच्या दक्षिणेस 200 मीटर अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूच्या पासून मिळालेल्या सुखानंदाविषयी गोपाळ एकमेकांमध्ये संवाद करीत होते. त्या वेळी एक संन्यासी त्या मार्गाने जात होता. त्याने गोपाळांचा संवाद ऐकला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणू लागला, “ही गाई-गुरे राखणारी मुले, यांना सुख आणि आनंद काय माहीत! हा शब्द विद्वान लोकांचा आहे! हा शब्द ही गुराखी मुले कसा काय जाणतात!” म्हणून जिज्ञासापूर्वक त्या संन्याशाने मुलांना विचारले, मग गोपाळांनी घडलेली सर्व हकिगत सांगितली. संन्याशाने विचारले, “ते देव कुणीकडे गेले?” गोपाळ म्हणाले, “याच मार्गाने गेले.” लगेच तो संन्याशी येथे आला. त्यावेळी सर्वज्ञ येथे झाडाखाली बसले होते. सर्वज्ञांचे दर्शन झाले व सर्वज्ञांच्यापासून स्थिती झाली. (पूर्वार्ध लीळा 52, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

आसन तथा संन्याशास स्थिती देणे स्थान

नाळेश्वर चे एकूण स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 52
  • Naleshwar : गोपाळांतु खेळू :।।: गोपाळ सुखश्रवणें संन्यासिया भेटी : विद्याप्रदान:।।: 
  • गोपाळांतु खेळु गोसावी मार्गे बीजें करितातिः तवं गोपाळ राणेभेरीयांचा’ खेळु खेळत होतेः गोसावीं तेथ बीजें केलें: “हां गा गोपाळ होः हे तुम्हांआंतु खेळों ऐओं?” तीही म्हणीतलें: “या का जीः” सर्वज्ञ म्हणीतलें: “हें राणे होइलः तुम्ही भेरी होआः” “जी जीः” गोसावीं तेयांतु खेळों आदरिलेंः तवं गोसावीयांचेया गडेयावरि पेणा आलाः हे जाउनि तेयांचीये पाठीवरि बैसलेः आणि तेयांसि स्तीति जालीः पेणा’ उतरलाः परि तो पाठीवरौनि नुतरीः एरें म्हणीतलेंः “हा रेः पेणा उतरला तरि तुं का पाठीवरौनि नुतरसि?” “आरेः माझीये पाठी देओ बैसलाः की मज सुख आनंदु होतु असेः” तवं एकें म्हणीतलेंः “आगा देवाः माझीये पाठीवरि बैस कांः” आणि हे तेयाचीये पाठीवरि बसलें तेयासि सुखचि जालेंः मां आणी म्हणीतलें “माझीये पाठीवरि बैस कांः’ म्हणौनि हाचि खेळु प्रवर्तलाः ऐसें आवघीयांचीए पाठीवरि आरोहण केलेंः आवघयांसि सुख आनंदु दीधलाः मग गोसावीं बीजें करूं आदरिलेंः गोपाळी गोसावीयांतें वीनवीलेंः “जी जीः गोसावी आरोगण करावीः मग गोसावीं बीजें करावेंः” मग आवघां मोटा सोडिलीयाः गोपाळी काला केलाः “एई गा देवाः जेउंः” आपुलालीये मोटेचा बरवा बरवा पदाधु नीवडीलाः मग गोसावीयांसि वोळगविलाः गोसावीयांसि आरोगण जालीः अवघे गोसावीयांचीये पांती जेविलेः मग हे तेथौनि नीगालेंः।। मग ते एकमेकांप्रति सुखानंदु म्हणौनि अनुमोदों लागलेः एरू म्हणेः “आगाः माझीए पाठीवरि देओ बैसलाः मां मज सुखानंदु काइ होए गाः” तवं मार्गे सन्यासी एक जात होते तेहीं आइकिलें मग तेही म्हणीतलें: ‘काइ पां आनंदु सुख? तें हे केवि जाणति? ए गोवळरूएं: गोरूवें राखतिः अनंदु” हे ब्रह्मवाचाः हा सबदु वीद्वांसाचाः हा सबदु हे गोवळे केवि जाणति?” मग तेयांतें ते पुसतिः “हा गाः गोवळे होः सुखानंदु काइसा गा?” तेही म्हणीतलेंः “आगाः आम्हांआंतु देवो एक आलाः आमसी खेळीनलाः आमचीए पाठीवरि बैसलाः तो जेयाचीये पाठीवरि बैसे तेया सुखानंदु होएः आम्हांआंतु जेविलाः आम्हां सुखानंदु. दीधलाः मग गेलाः” तेहीं पुसिलेंः “तो देवो कवणीकडे गेला?” “ना एणेंचि मागेंजातातिः” तैसेचि ते तेणें मार्गेनीगालेः तवं एका वृक्षाखालि हे आसनी बैसलें होतेंः तीही एउनि दंडवत घातलेंः श्रीचरणां लागले आणि तेयां स्तीति जालीः सर्वतें म्हणीतले :”ते अद्यापि द्रावडदेसी आचारीए’ होउनि वर्तत असतिः”।।

Gopalchawadi & Naleshwar Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: