Naigaon (नायगाव)

नायगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - जुन्या नायगांव पासून 1 कि.मी.अंतरावर पुणतांबा रोडच्या बाजुलाच लहानश्या मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

श्रीरामपूर-नाऊर मार्गावरील नायगाव फाट्याहुन नायगावला जाता येते, पुणतांबा ते जुने नायगाव 7 कि.मी. हिंगोणीहून आग्नेयेस नायगाव (डोक नांदूर, हिरडे वस्ती मार्गे) 8 कि.मी. आहे. नायगाव व नायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. नायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान जुन्या नायगावच्या नैर्ऋत्येस एक फर्लाग अंतरावर पुणतांबा रस्त्याच्या दक्षिणेस तरटीच्या झाडाखाली पूर्वाभिमुख लहान देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुणतांब्याहून नायगावला आले. त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. तेवढ्यात दायंबा आले. सर्वज्ञांची व दायंबांची भेट झाली. (पू. ली. 284 ख. प्र., स्था. पो.) त्यानंतर ते तेथून नाऊरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


नायगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 280
  • Naigaon : नायगावीं दायंबा भेटी :॥:
  • गोसावी नायगावां बीजे केलेः गावांपस्चिमे देउळः तेया देउळां गोसावी बीजे केलेः तेथ नावेक आसन जालेः तवं दायंबा पैलिकडौनि आलेः साजेयापासी भेटि जालीः दंडवते घतलीं: पाने पोफळें आसनावरि ठेउनि श्रीचरणां लागलेः मग साजा गनेशीं गोसावियांसी नावेक आसन जालेः गोसावी बैसा म्हणितलें: दायंबा गोसावियांपूढा बैसलेः गोसावी पूसिलेः तुमचें कुटुंब निकेनी असेः दायंबाये म्हणितलेंः जीजी निकें जीः मग गोसावी तेथौनि बीजे केले :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-कुंकुमठाण-पुणतांब्यावरुण आले व नाउरकडे निघले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: