Nagmthan (नागमठाण)

नागमठाण, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान नागमठान गावाच्या पूर्वेकडे 2  कि.मी.अंतरावर शेतात आहे. नागमठान गावात चौकशी करून जावे लागते.


जाण्याचा मार्ग :

चांदेगावहून आग्नेयेस नागमठाण 3 फाग आहे. नागमठाणला जाण्यासाठी वैजापूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

नागमठाणच्या पूर्वेस चार फर्लाग अंतरावर गाढेपिंपळगाव रस्त्याच्या दक्षिणेस शेतात विहिरीच्या उत्तरेस उत्तराभिमुख देवळात हे स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी या विभागास ‘तपोवन’ असे नाव होते. येथे माणिकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात चांदेगावहून तपोवनला आले. त्यांना येथे आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा विडा झाला. मग सर्वज्ञ येथून हमरापूरला गेले. (पू. ली. 295, ख. प्र. स्था. पो. उ. खा. द. शा. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


नागमठाणचे स्थान :1


  • Purvardha Charitra Lila –
  • Nagamthan : तपोवनि मानिकेश्वरी आसन :॥:
  • गोसावीयांसि दुपाहारिचा पूजावसरु आरोगणा जालीः मग बीजे केले :॥:
  • (..येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे… येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी पुणतांबा-हिंगुणि-पूरणगाव-धोतरा-सांगवखेड-वांजरगाववरुण आले व खातिगाव-डोमेग्राम कडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Nagamthan : जुना नागमठाणीं वसति :॥:
  • जुना नागमठाणीं अदित्यु पुर्वामुख दारवंठाः उत्तरामुख गाभाराः तेथ वसति जाली :॥:
  • (..येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे… येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी पुणतांबा-हिंगुणि-पूरणगाव-धोतरा-सांगवखेड-वांजरगाववरुण आले व खातिगाव-डोमेग्राम कडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: