Nagalwadi (नागलवाडी)

नागलवाडी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर


येथील 4 स्थान - नागलवडी गावाच्या इशान्येकडे डोंगराची दरी आहे त्या नागार्जुन दरीच्या तोंडाजवळ 2 स्थाने आहेत.
2 स्थान नागलवाडीच्या वायव्येस एक कि. मी. अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात केदारेश्वराचे पुर्वाभिमुख देऊळ आहे. त्या देवळाच्या पाठीमागे जळमांडवी म्हणजे विहीर आहे. विहीर नमस्कारी आहे. केदारेश्वराचे पुर्वाभिमुख देवळाचा डावा चौक नमस्कारी आहे.


जाण्याचा मार्ग :

लाडजळगावहून दक्षिणेस नागलवाडी (गोळेगाव मार्गे) 6 कि. मी. आहे. नागलवाडीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान नागलवाडीच्या ईशान्येस एक फलांग अंतरावर डोंगराच्या दऱ्यात नागार्जुनाच्या उत्तराभिमुख भुयाराच्या तोंडी आहे. स्थानाचा ओटा नाही. जागा निश्चित आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना या भुयाराच्या तोंडी लोंबता श्रीचरणी आसन होते. तेव्हा सर्वज्ञ दायंबाला म्हणाले, “या भुयारात नागार्जुन पडलेला आहे. त्याचे धड आणि शिर वेगळे पडले आहे. जो कोणी ते लावेल, त्याला सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही जाऊन लावले, तर तुम्हालाही सिद्धी प्राप्त होईल.” दायंबा म्हणाले, “जी जी आपण आम्हाला कुठे दर्शन द्याल?” सर्वज्ञ म्हणाले, “ते सांगता येणार नाही.’ दायंबा म्हणाले, “तर मग तसाच पडून राहू द्या.” (उ. ली. 553, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. मादने स्थान :

सन 1991 मध्ये विवराच्या समोरील जागेत एक स्थान बांधण्यात आले आहे. ते स्थान पोथीप्रमाणे ‘मादने स्थान’ घडू शकते.


3. जळमांडवी, जळक्रीडा स्थान :

नागलवाडीच्या वायव्येस एक कि. मी. अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात केदारेश्वराचे पुर्वाभिमुख देऊळ आहे. त्या देवळाच्या पाठीमागे जळमांडवी म्हणजे विहीर आहे. विहिरीचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. तेच जळक्रीडा स्थान होय. विहीर नमस्कारी आहे. बाहेर उभे राहूनच नमस्कार करावा.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथे जळक्रीडा केली. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. केदाराच्या देवळाच्या चौकातील आसन स्थान :

नागलवाडीच्या वायव्येस एक कि. मी. अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात केदारेश्वराचे पर्वाभिमुख देऊळ आहे. डावा चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभु जळक्रीडा करून झाल्यावर केदाराच्या देवळाच्या डाव्या चौकात आसनस्थ होत असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात लाडजळगावहून नागलवाडीला आले. नागार्जुनाची खांडदेवळी पश्चिमाभिमुख होती, नासीच्या पटीशाळेवर त्यांचे 20 दिवस वास्तव्य होते. खांडदेवळी, पटीशाळा पडल्यामुळे अवस्थान स्थान बुजून गेले आहे. ते आज उपलब्ध नाही. त्या जागेचे उत्खनन केल्यास स्थान उपलब्ध होऊ शकेल. 20 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून चकलांब्याला गेले.


अनुपलब्ध स्थान :

1. नासीच्या पटीशाळेवरील अवस्थान स्थान.
2. ओहळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.
3. देवळाच्या अंगणातील आसन स्थान.
4. पौळीच्या आग्नेय कोनी पटीशाळा त्या पटीशाळेवरील आसन स्थान.
5. उत्तरेच्या पटीशाळेवरील आसन स्थान.
6. पटीशाळेच्या पश्चिमीली सीरा आसन स्थान.
7. परिश्रय स्थान.


नागलवाडीची एकूण स्थाने : 11


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: