Miri (मिरी)

मिरी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर


येथील स्थाने मिरी गावाच्या वायव्येकडे गांवातच मंदीरात ही 2 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

मिरी हे गाव, शेवगाव ते पांढरीचा पूल या मार्गावर शेवगावहून नैर्ऋत्येस 29 कि. मी. आहे व पांढरीच्या पुलाहून पूर्वेस 14 कि. मी. आहे. ढोरजळगाव ते मिरी 14 कि. मी. आहे. मिरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. मिरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान मिरी गावाच्या वायव्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभ आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात रांजणगावहून मिरीला आले. त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. दररोज दादोसांचा उपहार होत होता. (उ. ली. 257, स्था. पो.)

2. एके दिवशी भटोबासांच्या प्रश्नावरून सर्वज्ञांनी त्यांना अटनविधीचे निरूपण केले. (उ. ली. 258) वीस दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून लोहसर खांडगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

2. मादने स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्व बाजूस आहे. (स्था. पो.)


देवळासमोरील तीन स्थाने निर्देशरहित आहेत.


अनुपलब्ध स्थान :

1 अग्नीष्टिका आसन स्थान.
2 देवळाच्या वायव्येचे परिश्रय स्थान.


मिरीची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: