Mirgaon (मिरगाव)

मिरगाव, ता. गेवराई, जि. बीड.


येथील 1 स्थान - हे स्थान मिरगांव गावातच पश्चिमेकडे पान्याच्या टाकीजवळ लहान मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

संगमजळगावहून पूर्वेस मिरगाव पायमार्गे (दैठण पंडिताचे मार्गे) 9 कि. मी. आहे. संगमजळगावहून दैठण, आंतरवाली (वावरेची) मार्गे मिरगावला जाता येते. मिरगावला जाण्यासाठी गेवराईहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. गेवराई ते मिरगाव (बागपिंपळगाव – तलवाडा रस्ता – सूतगिरणी-दैठण पंडिताचे – आंतरवाली वावरेची मार्गे) 23 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान मिरगावच्या पश्चिम विभागी पाण्याच्या टाकीजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नागनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पापविनाशनीहून मिरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 512, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून संगमजळगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


मिरगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 512
  • Mirgaon  :  मिरिगावीं नागनाथीं वसति :॥: 
  • गोसावी विळीचा वेळीं मिरीगावासि बीजें केलेंः गावापश्चिलीं विभागीं पूर्वाभिमुख नागनाथाचे देउळः तेथ बाइसीं चरणक्षाळन केलेः गुळुळा जालाः विडा ओळगविलाः मग विळीचा पूजावसरु जालाः तव नागदेवभट्ट उपाहर घेउनि आलेः गोसावीयांसि दंडवते घातलीः श्रीचरणां लागलेः श्रीमूर्ती अवलोकित बैसलेंः बाइसीं गोसावीयांसि ताट केलेः भक्तिजानां वाढिलेः गोसावीयांसि आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः भक्तिजानां पांती जेवणें जालीः गोसावीयांसि तेथची वसति जाली :॥
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने…. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामीं रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पापविनासनीला आले. स्वामींचे पापविनासनीला ३ दिवस वास्तव्यास(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमेश्वरकडे निघाले तेव्हा मिरि येथे वसतिला थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: