Mirajgaon (मिरजगाव)

मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर


मिरजगांव गावाच्या जवळच्या तिर्थाचा मळा आहे, तेथे मंदीरात हे 2 स्थाने आहेत. 


जाण्याचा मार्ग :

मिरजगाव, अहमदनगर सोलापूर मार्गावर अहमदनगरपासून 52 कि.मी. आहे. घोगरगावहून आग्नेयेस मिरजगाव 16 कि. मी. आहे. मिरजगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान मिरजगावच्या नैर्ऋत्येस रवळगाव वेशीपासून 200 मीटर अंतरावर तीर्थाच्या मळ्यात पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वाकीहून मिरजगावला आले. त्या वेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. ( पू. ली. 350, स्था. पो.) व उत्तरार्धातही वाकीहूनच मिरजगावला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्रच वास्तव्य होते. (उ. ली. 272, स्था. पो.) सायंकाळचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा असे दोन्हीही पूजावसर येथे झाले. (उ. ली. 288, ग. प्रत) दोन्हीही वेळेस सर्वज्ञ येथून घोगरगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वसती स्थानाच्या ईशान्येचे 4 फूट 10 इंच अंतरावरील स्थान निर्देशरहित आहे.


2. सोंडी आसन स्थान :

हे स्थान निर्देशरहित स्थानापासून किंचित आग्नेयेस 5 फूट 4 इंच अंतरावर आहे. (पू. ली. 364, ख, प्रत, वि. स्था. पो. क्र. 892, 1279)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


मिरजगावची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: