Maygaon (मायगाव)

मायगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

येथील 4 स्थाने - मायगांव येथे एकाच ठीकाणी 4 स्थाने आहेत. वडवाडी गावाच्या नैऋत्येकडे 1 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर नवीन मंदीरात आहेत.

जाण्याचा मार्ग :

मायगाव, पैठण-शहागड मार्गावरील मायगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते मायगाव फाटा 11 कि.मी. शहागड ते मायगाव फाटा 29 कि.मी. मायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान मायगावच्या दक्षिणेस एक फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या पश्चिम काठी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे निकळंकाचे देऊळ होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात रात्रीच्या वेळेस नवगावहून मायगावला आले. त्यांना येथील ओट्यावर आसन झाले. चरणक्षाळण, गुळळा, विडा झाला. मग ओट्यावरच पहुड झाला. (पू. ली. 568, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून वडवाळीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

2. पूजावसर स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या आग्नेयेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा :1) सर्वज्ञांचा सकाळचा पूजावसर येथे झाला.

2) नाथोबांना टिळा पुरविण्याचा व तिथी वार सांगण्याचा विधी निरुपणे. (पू.ली.570, स्था. पो.)

3. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. (स्था.पो.)

4. उदका विनियोग स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या ईशान्येस पश्चिमाभिमुख देवळात आहे. (पू.ली. 631 ख.प्र.)

मायगावची एकूण स्थाने : 4

  • Purvardha Charitra Lila –
  • Mayagaon : मंडळीका तिथीवारू वीधि सांघणें :।।: / मंडळीका टीळा तिथीवारू नीमु :।।:
  • गोसावियांसि चौकीं पूजावसर जालाः अवघे भक्तिजन गंगे गेले होतेः तें संध्या करूं करूं आलेः परि टिळें न लवतिचिः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः गोसावियांपासी बैसलेः मग नाथोबातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः तुम्हां टिळा कव्हणाही नाहीं तें काइ? टिळा लाविजे कीं: हें गंगातीरः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मंडळीकाः तुम्हीं नीच यां अवघेयांसि टिळा उगाळुनि द्यावाः टिळा पूरवावा आणि एथें तिथीवारू जाणवाः’’ ऐसां वीधि विहिलाः मग तिहीं ‘‘जी जीः’’ म्हणौनि तेधवाचि गोपीचंदन काढिले आणि टिळा उगाळिलाः एरीं अवघां टिळें लाविलेः गोसावियांपुढा तिथीवारू जाणविलाः देउळाचां चौकीं पूजावसर जालाः तें दिसवडी तैसेचि करीति :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाव-हिरडपूरी-नवगाववरुण मायगांवला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं पैठणकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Mayagaon : प्रातःकाळीं इंद्रभटां देवतावीधिप्रश्नु/सीक्षापण :।।:
  • गोसावी पश्चात पाहारीं परिश्रयासि बिजें केलें: परिश्रयोसारूनि आलेः उदका विनियोग केलाः चौकीं ओटयावरि आसन जालें: उदेयाचि इंद्रभट गंगैसि गेलेः संध्या करौनि आलेः तेव्हेळी गोसावियांसि दंतधावन होत होतें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: गोसावी ऐसीं सिलिक धरिलीः आणि म्हणितलें: ‘‘इंद्रेयाः देवतेसि नमस्कारू केला कां नाहीं?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी नाहीं जीः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘रात्री तरि रात्रीः एथचिये देवतेसि नमस्कारू न कराचिः आतां तरि आतां देवतेसि नमस्कारू न कराचि तें काइ?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः विसरला जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोरे हो तैसेंचि आपुला महात्मा देखौनि विसरालः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः तें आमचिया गोसावियांचेः तयातें कैसें विसरौनि? मां तेयासि कैसें न करूं? गोसावियांचें जे येति तयां कैसें विसरौनिः तयातें विसरौनि तरि देवातें विसरौनि कीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः जाचां हृदयीं देव तयातें जरि विसरिजेः तरि एथ विसर पडेः’’ तें ‘‘जी जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाव-हिरडपूरी-नवगाववरुण मायगांवला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं पैठणकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Mayagaon : निष्कळंकीं वस्ति :।।:
  • तैसेचि गोसावी निष्कळंकासि बिजें केलें: निष्कळंकाचें देउळ पूर्वाभिमुखः पुढां पटिशाळः जगतिचां दारवंठां तोही पूर्वाभिमुखः गोसावी जगतिचा दारवंठां पातलेः तवं वाती जाता देखिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं पुढां जाः वाती आबुथाः वाती जावो नेदाः डोचें तूप घालाः’’ बाइसें पुढां पटिशाळें गेलीः बोटें वाती आबुथलीः तूप घातलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बोटें वाती आबुथीजेना कीं: हें देवतेचें देवस्वः चंडीसः नखाग्रांतु तेल रीगेः बोटें माखतिः वाया जाएः म्हणौनि सिलिक घेइजेः सिलिका वाती आबुथजेः हें देवतेचें देवस्व इवलेही वाया जावो नेदीजे कीं:’’ ‘‘हो कां बाबाः’’ म्हणौनि बाइसीं गोसावियांसि ओटयावरि शयनासन रचीलें: गोसावियांसि आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गुळळा जालाः विडा जालाः पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाव-हिरडपूरी-नवगाववरुण मायगांवला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं पैठणकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Mayagaon : तथा स्वानध्वनिश्रवणें अभयदान :।।:
  • गोसावी आपेगावां पैलीकडें बिजें केलें: तवं माऊंगावीची शुनी भुकिनलीं: माउंगावां ऐलीकडीलु वोहोळु पातलेः गोसावी वोहळांतु बिजें केलें: तवं इंद्रभट सावेयां बहुतचि भियों लागलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भियानाः उगेचि न बोलत याः ये माउंगावींची शुनी भुंकतें असतिः’’ गोसावी वोहळ उतरलेः पैलाडी गोसावी इंद्रभटातें श्रीकरें धरूनि म्हणितलें: ‘‘कां गा लुखलुखतासिः भितासिः भेओ नकोः एथोनि गावं जवळीं असेः हें घेया पैलाडी दिवे दिसतातीः’’ इतुलेनि तयाचे भय निवर्तले :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाव-हिरडपूरीवरुण नवगावला आले येथुन मायगांवला जाताना “आपेगावां पैलीकडें — माउंगावां ऐलीकडीलु वोहोळु पातलेः” तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं पैठणकडे निघाले…)

  • (नवगाव व मायगांव या रस्त्यातील “आपेगावां पैलीकडें — माउंगावां ऐलीकडीलु वोहोळु पातलेः” तेथील लीळा असल्यामुळे मायगांव या ठीकाणी ही लीळा Upload केली आहे.)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: