Mauda (मौदा)

मौदा, ता. मौदा जी.नागपूर


मौदा येथील 1 स्थान मौदा शहराचे पश्चिमेकडे कन्हान नदीचे पात्रात मोठ्या खडकावर आपले मंदीर आहे तेथे आहे. आता पावसाळ्यातही जाता येते. मौदा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. हायस्कूल लगतच महानुभाव आश्रम आहे . 

स्थान बस स्थानका पासून 1 KM अंतरावर आहे

जाण्याचा मार्ग :

मौदा हे शहर तालुका आहे. नागपुर-भंडारा रोडवर नागपूर पासून ४० की.मी.अंतरावर आहे. भंडार्या पासून २४ की.मी.अंतरावर आहे.


स्थानाची माहिती:

1. वसती स्थान:

हे स्थान मौदा गावाच्या पश्चिमेस कन्हान नदीच्या पात्रात विस्तीर्ण खडकावर देवळात आहे.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा 47)

2. याच ठिकाणी भांडारेकार सर्वज्ञांना झोपण्यासाठी शयनासन रचत होते. त्या वेळी त्यांना इंगळीने दंश केला. त्यामुळे त्यांना असह्य पीडा होऊ लागली. भांडारेकारांनी सर्वज्ञांना विचारले, “मी आपली स्तुती करू ?” आणि सर्वज्ञांची आज्ञा मिळताच त्यांनी स्तुती करण्यास प्रारंभ केला. जशी जशी स्तुती केली, तसे तसे इंगळीचे विष उतरू लागले आणि संपूर्ण विष हरण झाले. (पूर्वार्ध लीळा 47)

नदीच्या पात्रातील मुख्य खडक नमस्कारी आहे. त्याच्या जवळच स्थानाचा ओटा आहे, ओट्याचे मागचे स्थान निर्देश रहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

वसंत पंचमी च्या यात्रेला जमलेली भाविकांची गर्दी

मौद्याचे एकूण स्थान : 1

निर्देशरहित स्थान : 1


  • Lila : Purvardha Charitra – 47
  • Mauda :  भांडारेकारां स्तुति करावेया आनोज्ञा :।।: 
  • भांडारेकारांची स्तुति गोसावीं सांघीतली: भटांचीए स्तुतीवरिः सर्वज्ञ म्हणीतलेंः “कां गाः काहीं आपुलें की एथिचे?” भटी म्हणीतलेः “जी जीः गोसावीयांचे कीः सर्वज्ञे म्हणीतलेः “एथिचेंचि एथ काइ बोलावे असे? स्तुति ऐसी भांडारेकारचि करूं जाणतिः” भर्टी म्हमीतलेः “तें कैसें जी?” सर्वज्ञं म्हणीतलेंः “हे भांडारांहुनि नौगालेः भांडारेकार भीक्षा करीतिः यांसि आरोगण देतिः मग आपण उचीष्ट प्रसादु घेतिः श्रेष्ट ठाओ तो पहडावेया यांसिः एथची सेवा करीतिः हें नीदवीज : मग आपण एकाधी एकी कोणटाः का देउळाबाहीरि एकाधीए देउळीः तेथ नीद्रा करीतिः” ऐसें भांडारेकारांसि सोळा वरीखें सन्यमानः गोसावी मार्गे बीजें करीतिः एकी’ गावीं गोसावीयांसि बस्ति जालीः भांडारेकार होसावीयांकारणे सयनासन रचुं गेले तवं भांडारेकारातें वींगुळी खादले ते थोर दूख व्यथा हों लागलौः मग गोसावीयांतें वीनवीलें: “जी जीः मातें वींगुळी खादलें तें मज थोरि दुख वेथा होताए जीः तरि मी गोसावीयांची स्तुति करूं?” सर्वज्ञे म्हणीतलेंः “कराः” मां एथिची स्तुति करूं लागले”: मां जवंजवं स्तुति करीति तवंतवं दुखाची वेथा उणी’ होएः एसी वींगुळि उतरलीः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागले. मग गोसावीं उदीयांचि तेथौनि बीजें केलेंः :।।:


Mouda Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: