Matulgram (मातुळग्राम)

मातुळग्राम, ता. जि. अमरावती


येथील 3 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) एकाच परीसरात आहेत - 2 स्थाने नांदुरा व रोहणखेडा या दोन गावांच्या मधोमध भव्य मंदीरात आहेत.  तर 1 स्थान या मंदीरापासुन पूर्वेकडे वाडासदृश्य मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

नांदगावहून उत्तरेस मातुळग्राम (कठोरा, नांदुरा मार्गे) 8 कि. मी. आहे. अमरावतीहून पुजदा, रोहणखेडा मार्गे मातुळग्रामला जाता येते व चांदूरबाजारहन शिराळा फाटा, शिराळा, पुजदा, रोहणखेडा मागे मातुळग्रामला जाता येते. अमरावती ते मातुळग्राम (मार्गे पुजदा) 29 कि.मी. आहे. रोहणखेडा ते मातुळग्राम 1 कि. मी. आहे. तसेच शिराळा, देवरा, खापरखेडा मार्गेही मातुळग्रामला जाता येते.


स्थानाची माहिती :

1. श्रीगोविंदप्रभूचे जन्मस्थान आणि अवस्थान स्थान :

हे स्थान नांदुरा गावाच्या उत्तरेस दीड कि. मी व रोहणखेडा गावाच्या ईशान्येस दीड कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : या ठिकाणी परमेश्वर अवतार श्रीगोविंदप्रभू यांचा जन्म काण्व शाखी ब्राम्हण कुळात झाला. त्यांच्या आईचे नाव नेमाइसा व पित्याचे नाव अनंतनायक. श्रीगोविंदप्रभूच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या आत त्यांच्या मातापित्याचा देहान्त झाला. मग मामा मावशीने त्यांचे संगोपन केले. वयाच्या आठव्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर मामा मावशीने त्यांना विद्याभ्यासासाठी रिद्धपूरला आणले (ना. प्र. ली. 1 पू. ली. 15, स्था. पो. मा. शा. प्रत)

जन्मस्थानाच्या गाभाऱ्या बाहेरील दक्षिणेचे एक स्थान व उत्तरेची दोन स्थाने निर्देशरहित आहेत.


2. रिठाचे स्थान :

हे स्थान जन्मस्थानाच्या पूर्वेस दक्षिण बाजूला आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू पुजद्याहून मातुळग्रामला आले. येथे चरणचारी उभे राहून म्हणाले, “हे मामाचे घर. हे मावशीचे घर. आम्ही येथे लहानाचे मोठे झालो. मुंज झाली. त्यानंतर मामा मावशीने रिद्धपूरला नेले.” असा श्रीप्रभुंनी आपल्या बालपणीच्या निवासस्थानाचा भक्तजनांना परिचय करून दिला. (गो. प्र. च. 231, स्था. पो. मा. शा. प्र.)

रिठाच्या स्थानाच्या उत्तरेचे मांडलिक स्थान आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील दोनही स्थान.


3. भोपळे खाववणे स्थान :

हे स्थान देवळाच्या ईशान्येस पेढी नदीच्या पश्चिम काठावर देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू मातुळग्रामला आल्यावर सर्व भक्तजनांना भूक लागली. भक्तजन श्रीप्रभुंना म्हणाले, “आम्हाला भूका लागल्या आहेत.’ येथे कडू भोपळ्याचे वेल होते. ते कडू भोपळे श्रीप्रभुंनी दृष्टीने अवलोकन केले. तेव्हा त्याची चव बदलून ते भोपळे अमृताप्रमाणे गोड झाले. मग भक्तजनांनी केळाप्रमाणे तृप्ती होईपर्यंत खाल्ले. (भी.प्र.ली. 207, स्था.पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थाने : 3


मातुळग्रामची एकूण स्थाने : 3


  • Govind Prabhu Charitra Lila – 231
  • Matulgram : मातुळग्रामी ग्रीबा खाववणे :॥
  • मग गोसांवी मातुळग्रामासि बीजे केलें : तेथ पांढरीयवरि कहु भोपळीया नीगालीया होतीया : आंणि भगतजनें अवघीं भुकैली होती : ते भोंपळे गोसावी दृष्टी अवलोकीलें : आणि अमृत ऐसे जालें : मग गोसावी म्हणीतले : ” आवो मेला जाय : ग्रीवा खाय ना म्हणे : ” भगतीजनें खाउनि पाहाति : तवं गोड अमृत ऐसे असेति : मग अवघा तृप्त परयंत खादले : जैसी केळासि चवि तैसे लागेति : मग गोसावी तया रीठापासि बीजें केलें : ते रीठ देखौनि आपलवले : मग गोसावी म्हणीतले : ” हे मामे. याचे घर : हे माउसीयचें घर : हे यथ वाढीनले : मुंजि-बंधन केलें : मग रीधारासि घेउनि गेले :” ।। २३१॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: