Mategaon (माटेगाव)

माटेगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान माटखेड गावाच्या पूर्वेकडे गावालगतच येळगंगा नदीच्या काठावरील मंदीरात आहे. मंदीरास कुलुप असते चावी मागावी लागते.


जाण्याचा मार्ग :

माटेगाव, देवगाव वेरूळ मार्गावरील माटेगाव फाट्यापासून 2 कि.मी. आहे. देवगाव ते माटेगाव फाटा 7 कि.मी. वेरूळ ते माटेगाव फाटा 5 कि.मी. विटखेडा ते माटेगाव फाटा 2 कि.मी. विटखेड्याहून किंचित् ईशान्येस माटेगाव पायमार्गे (मार्गे चांभारवाडी) 2 कि.मी. आहे. माटेगावहून वेरूळला जाता येते.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान माटेगावच्या पूर्वेस गावालगतच येळगंगा नदीच्या उत्तर काठावर रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे पूर्वार्धात वेरूळ येथे वास्तव्य असताना देवगिरीचा राजा महादेवराय, त्यांच्या दर्शनाला येणार होता; परंतु तो दर्शनाला अपात्र असल्यामुळे सर्वज्ञांनी वेरूळहून प्रयाण केले आणि ते माटेगावला आले. त्यांना येथे आसन झाले. (पू.ली. 227, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून विटखेड्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) लिंगाच्या देवळातील वसती स्थान.


माटेगावची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Matkhed : मांटखेडां वस्ति :।।: / मांटखेडां वस्तिः राजागमनवार्ता श्रवण :।।:
  • मग गोसावी तेथौनि माटखेडेयासि बिजें केलें: गावांपूर्वे वडाखाली आसन जालें: गोसावी आसनीं उपविष्ट असतिः तवं बाइसें तियाची उदका गेलीः तवं माटखेडाचियां गौळणी बाइला कटकासि दहीं दुधें तुपें विकों गेलिया होतियाः तिया आलीयाः पाणीवथेचिया बाइला गोष्टि करूं लागलीयाः पाणीवथाचां बाइलीं दहीकरणीतें पुसिलें: ‘‘हा वोः आजी लवचिकरौनि आलीयातितें काइ?’’ तवं एरीं म्हणितलें: ‘‘ना दिसवडी कटका जाओः तो उसीरू लागेः आजी रावो एळापूरा पुरूखाचेया दरीसना आलाः तेथ कटक अपार आलें म्हणौनि तेंथचि दहीदूध विकलेः म्हणौनि लवकरि आलों:’’ तें बाइसीं आइकीलें: आणि पुसिलेः ‘‘ते पुरूख भेटले?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना न भेटतीचिः लेणे लेणे शोधिलेः परि न भेटतीचिः’’ ‘‘मग राजा काइ म्हणे?’’ तिया म्हणितलें: ‘‘आइः तें आम्हीं केवीं जाणों? परि कटकामध्यें हेंचि वार्ता आणिकी काही गोष्टि नाइकीजे आइः ऐसें सांघतिः ‘राजा थोर अपरीतोषातें पावलाः’’ मग बाइसीं तें येउनि गोसावियांपुढां सांघितलें: ‘बाबाः पाणीवथां बाइला गोष्टि करीत होतियाः’’ मागिल वृत्तांतु सांघितलें: ‘बाबाये म्हणितलें तें साच जालें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुमतें म्हणितलें कीं: दिसु एथे निणीलः’’ बाइसासि थोर आश्चर्य जालें: माटखेडां लिंगाचा देउळी वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे एळापूर(वेरुळ) वरुण माटखेड्याला आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: