Masrul (मासरुळ)

मासरुळ, ता.जि.बुलढाणा


येथील 6 स्थाने 2 ठीकानी आहेत -
अवस्थान,आरोगण व मादने स्थान - ही 4 स्थाने मासरुळ गावातच मधोमध भव्य मंदीरात आहेत. येथे मुख्य मंदीर व मंदीर परिसरात ही सर्व स्थाने आहेत. 
विरहण स्थान - ही 2 स्थाने - मासरुळ गावाच्या पूर्वेकडे 1 कि.मी. अंतरावर श्री घुले यांचे शेतात आहेत.


जाण्याचा मार्ग :

मासरूळ हे गाव, मढ धामणगाव मार्गावर मढहून दक्षिणेस 12 कि. मी. आहे व धामणगावहून उत्तरेस दीड कि.मी. आहे. मढ हे गाव, अजिंठा-बुलढाणा मार्गावर आहे. बुलढाणा ते मासरूळ (मढ मार्गे) 33 कि.मी व धाडमार्गे 25 कि. मी. जाळीचा देव ते मासरूळ 14 कि.मी. पारध ते मासरूळ 3 कि.मी. मासरूळला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 4 स्थाने.

1. अवस्थान स्थान :

हे स्थान मासरूळ गावाच्या मध्यभागी उंच जागेवर दक्षिणाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे साइदेवांचा आवार होता. देवळाकडे चढून जाण्यासाठी ईशान्य व नैर्ऋत्य बाजूने पायऱ्या आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तपोवनहुन मासरूळला आले. त्यांचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते.
(पू. ली. 424, स्था. पो.) त्यानंतर ते येथून पिंपळगावला गेले.


2. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या आग्नेयेस आहे. (पू. ली. 424)


3. आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या वायव्य विभागी थोड्या खोल जागेत आहे. (स्था. पो.)

लीळा : सर्वज्ञ तपोवनहुन आल्यावर प्रथम त्यांना येथे आसन झाले. साइदेवांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गंधाक्षता लावल्या. विडा अर्पण केला. (पू. ली. 357 क. प्र.)


4. मादने स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपाच्या आग्नेय विभागी आहे.


Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील 2 स्थाने.

5,6. विहरण स्थाने :

ही दोन स्थाने मासरूळ गावाच्या पूर्वेस दोन फर्लाग अंतरावर ओढ्याच्या पलिकडे श्री. गंगाधर कृष्णा घुले यांच्या मळ्यात दक्षिणाभिमुख देवळात आहेत.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज येथे विहरणासाठी येत असत. (पू. ली. 424, स्था. पो.)


अनुपलब्ध स्थान :

1. परिश्रय स्थान


मासरूळची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila – 424
  • Masarul : साइंदेवा भेटी :॥: मासरुळीं अवस्थान :॥:
  • गोसावी तपोवनी सिद्धनाथाचेया देउळांतु बीजें केलेंः पूर्वामुख सिद्धनाथाचे देउळः जगतिसी दारवंठे दोनः एक पूर्वाभिमुखः एक उत्तराभिमुखः भितरी चौकीं नावेक आसन जालेंः सिद्धनाथाचे रचमचेचे देउळ म्हणौनि तेथौनि बीजें केलेंः सिद्धनाथाचेया देउळादक्षिने आडवांगी जगतिआंतु आग्नेये लिंगाची देउळी पूर्वाभिमुखः तिये देउळीये बीजें केलेंः तेथ आसन जालें :॥: तवं साइंदेवा सिद्धनाथाची भक्तिः तें दांडीये बैसोनि देउळासि आलेः चौकीं आपुलीं वस्त्रें ठेवलींः कौपिनु केलाः आपनचि घागरी घेउनि पाणी वाहिलेः सिद्धनाथाचां आंगणि सडा घतलाः देवतेसि स्तर्पण केलेः पूजा केलीः मग प्रदक्षिणा करावेया तेउते आलेः तवं गोसावीयांते आसनी देखिलेंः भेटी जालिः दंडवतें घतलीः श्रीचरणां लागलेः जवळी येउनि बैसलेः मग गोसावीयांते गावांतु नेयावेया विनविलेः गोसावी विनती स्वीकरिलीः आणि परमानंदातें पावलेः गोसावी आंगणीं दांदीयेवरि आरोहण केलेः तें वोडनखांडे घेउनि पाइकासरिसे पुढा खोलत निगालेः गोसावी तयांते घोडेयावरि बैसविलेः सर्वद्यें म्हणीतलेः नायेको तुम्ही घोडेयावरि बैसाः तिही म्हणीतलेः जीजी मी घोडेयावरि न बैसेः मी गोसावीयांपूढे खोलैनः सर्वद्यें म्हणीतलेः तरी हे उतरेलः मग ते घोडेयावरि बैसले :॥: मग गोसावी मासरुळा बीजें केलेंः उत्तरेचिया नगरमहाद्वारे गोसावी भितरी बीजें केलेंः ओवाळणी जालीः मग साइंदेवाचेया आवारासि बीजें केलेंः पटिशाळे उच्चासन घातलेः अर्ध्यपाद्य करौनि गंधाक्षत केलेंः गोसावीमुख्य समस्तासि टिळे विडे दिधलेः मग ओलनि ओळगवीलिः मर्दना मादने जालेयानंतरे सर्वांगी चंदनः अनेक पूष्पमाळाः धूप दिपः गंधः कणकमणिमय अळंकारभुशणीं ऐसे गोसावीयांते अर्चिलेः मग गोसावीयांसी ताट केलेंः आरोगणा जालीः साइंदेवासि पांती प्रसादु जालाः तेथ तचिये देव्हारचौकिये मासु एकु अवस्थान जालेंः त्यांतें एक ब्राम्हणाचें भानवस होतेः तेथ भक्तिजनालागी अन्न निफजेः गोसावीयांलागी उपाहारु निफजेः कदाचित तयाचेया घरिहुनि गोसावीयांलागी ताट येः गावापुर्वे विहीरः विहीरीपुर्वे पाळी आंबाः तेथ गोसावीयांसी विहरण होयेः प्रतिदिनी तिकडेचि परिश्रया बीजें करीति :॥: (टिप – येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात सेंदुर्णींवरुन सावळदबार्‍याला आले. सावळदबार्‍याला 20 ते 30 दिवस वास्तव्यानंतर मासरुळकडे जाताना स्वामींचे जाळीचादेव येथे आसन झाले. तेथुन स्वामी वालसावंगीवरुन तपोवन(मासरुळ)ला आले. येथे स्वामींचे 1 मास वास्तव्य (अवस्थान) झाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: