Mansar (मनसर)

मनसर, ता.काटोल जि.नागपूर


मनसर येथील आसन व मनशिळा ही 2 स्थाने एकाच ठिकाणी गावाच्या पूर्वेकडे रामटेक रोडवर तलावाच्या काठावर आहेत.


जाण्याचा मार्ग :

मनसर हे गाव, हैदराबाद-दिल्ली या राष्ट्रीय महामार्गावर नागपूरहून ईशान्येस 40 कि. मी. आहे. काटोल ते मनसर (नागपूर मार्गे) 97 कि. मी. आहे. मनसर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानालगतच महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान मनसर गावाच्या पूर्वेस दोन फलांग अंतरावर रामटेक सडकेच्या उत्तरेस तळ्याच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात रामटेकहून मनसरला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. भोगरामच्या ओट्यावर बसल्याने ज्या ब्राह्मणास स्थिती झाली, तो ब्राह्मण रामटेकहून मनसरला सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आला. येथे त्याला सर्वज्ञांचे दर्शन झाले आणि सर्वज्ञांच्यापासून स्थितीही झाली. (ए. ली. 19 ख प्र. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. मनशिळा आसन स्थान :

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

हे स्थान आसन स्थान देवळाच्या वायव्येस तळ्याच्या पश्चिम काठी टेकडीवर आहे. (स्था. पो.)

मनशिळा आसन स्थान
मनशिळा टेकडी परिसर

मनशिळा आसन स्थानाकडे जाताना डाव्या बाजूची दोन स्थाने मांडलिक


  • Purvardha Charitra Lila –
  • Mansar : मनसिळे ब्राम्हणां भेटिः स्तीति :।।: 
  • गोसावी बिजें केलेयाउपरी तेथिचा बडुवा आधीं गोसावियांचिया ओटयासि धूपार्ति करीः मग भोगरामासि करीः ऐसां एकु दीं एकु ब्राम्हणु भोगरामासि आलाः तो तया ओटयावरि बैसलाः आणि तयासि स्तीति जालीः आनंदु प्रगटलाः तो तया ओटयावरि अनुष्ठान करुं बैसला कीं तो अनुष्ठान विसरे आणि सुखचि होएः तो ओटयाखाली उतरे आणि स्तीति भंगेः दुसरां दीं सकाळीचि येउनि बैसलाः आणि तैसेचि स्तीतिसुख जालें: तवं बडुवा आलाः तेणें ओटा उदके सिंपीला आणि तुळसी वाइलीयाः फुल एक वाइलेः धूपार्ति केलीः मंगळार्ति केलीः वाधावन केलें: पाठीं देवतेसि पूजा केलीः मग तेणें ब्राम्हणे बडुवातें पुसिलें: ‘‘या ओटयावरि देवो ना देवताः तुम्हीं या ओटयासि पूजा धूपार्तिः मंगळार्तिः वाधावनें करित असा तें काइं? कव्हणासि करीत असा? एथ काइ असे?’’ तेणें म्हणितलें: ‘‘एथ इश्वरपुरूख एक होतेः तें कैसें बरवेः काइ सांघो तयाचे लावण्यः सौंदर्यः तें कैसें सौंदर्ये लावण्यें ओथलें: तें एथ होतें तवं तयांसि करूं: मग भोगरामासि करूं: तें पुरूख निगालेः मग तयांचीयां ओटयासि करूं: पाठी भोगरामासी करूं:’’ तेणें म्हणितलें: ‘‘ता नांव काइ?’’ राणेनि म्हणितलें: ‘‘ता नांव नग्नदेवः’’ तेणें म्हणितलें: ‘‘तरि तें केउते गेले?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ते मनसिळेसि गेलेः’’ तयासि वर्णव्यक्तीखुणा कैसिया तिया सांघितलियाः तैसाचि तो उठौनि सरिकरि निगालाः मनसिळेसि आलाः तळेयाचिये दक्षिणीली पाळीसि देउळः तेथ गोसावियांसि पींपळातळीं आसन होतेः दरीसन जालें: ब्राम्हणें येउनि दंडवते घातलीः श्रीचरणां लागलाः आणि गोसावियांपुढा बैसलाः गोसावी पुसिलेः ‘‘भटोः हें तुम्हा श्रुत की दृष्ट?’’ तेणे म्हणितलें: ‘‘ना जी श्रुतः’’ गोसावी पुसिलेः ‘‘ते कैसे?’’ तेणे म्हणितलें: ‘‘जीः मीं भोगरामासि आलाः गोसावियांचिया ओटयावरि कर्म अनुष्ठान करूं बैसलाः तवं विसरला आणि सुख जालें: खाली उतरला आणि सुख भंगलें: तवं तेथीचे विद्यार्थी बडवे आलेः तेहीं तया ओटयावरि पाणी घातलें: तुळसी वाइलीः फुलें वाइलीः धुपार्ति केलीः वाधावणें केलें: तयाते पुसिलें: ‘एथ धुपार्ति वाधावने काइसे?’ तिहीं म्हणितलें: ‘‘एथ इश्वरपुरूख एक होतेः तें कैसें बरवेः काइ सांघो तयाचे लावण्यः सौंदर्यः तें कैसें सौंदर्ये लावण्यें ओथलें: तें एथ होतें तवं तयांसि करूं: मग भोगरामासि करूं: तें पुरूख निगालेः मग तयांचीयां ओटयासि करूं: पाठी भोगरामासी करूं:’’ ऐसें भोगरामीचा बडवा गोसावियांचे बरवेपणः सौंदर्य लावण्य सांघितलें: मीया म्हणितलें: ‘ते कव्हणीकडें गेले?’ ‘ना तें मनसिळेकडें गेलेः’ तैसाचि एथ आला जीः’’ आणि तयापहार दोनी स्तीति जालीः भंगलीः मग श्रीचरणावरि माथा ठेविलाः कर जोडुनि विनविलेः ‘‘जी जीः माझेया घरासि गोसावी बिजें करावे जीः’’ मग विनती स्वीकरिलीः बिजें केलें: तेहीं बरवे आसन रचीलें: श्रीचरण क्षाळण केलें: गुळळा जालाः विडा जालाः मग पडदणी ओळगवीलीः मर्दना दिधलीः मार्जनें जालें: पूजा केलीः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः मग तेथौनि बीजें केलें :।।: (हे गोष्टि गोसावी हिवरळीये लुखदेवोबावरूनि सांघितलीः ब्राम्हणा स्तीति मनसिळेवेर्‍हीं :।।:)

Mansar Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: