Mangrul Pir (मंगरूळ पीर)

मंगरूळ (पीर) ता. मंगरूळपीर, जि. वाशिम


मंगरुळपिर येथील 1 स्थान मंगरुळपिर गावातच पूर्वेकडे बाजारात शिडीवन नदीच्या काठावर खंडेश्वर मंदीरात आहे.(येथील लोक विचारल्यास सांगतात. आता येथे नवीन मंदिर झाले आहे.)


जाण्याचा मार्ग :

मंगरूळपीर हे गाव, वाशिम-कारंजा मार्गावर वाशिमहून ईशान्येस 39 कि. मी. आहे व कारंज्याहून नैर्ऋत्येस 27 कि. मी. आहे. अकोला ते मंगरूळपीर 62 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान मंगरूळ गावाच्या पूर्व विभागी जुना आठवडी बाजारानजीक गोठाणाजवळ शिडीवन नदीच्या पश्चिम काठावर पश्चिमाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ‘खडकेश्वर संस्थान’ या नावाने ओळखले जाते.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात मान्याहून मंगरूळला आले. त्यांना वरहारदेवी देवळाच्या चौकात आसन झाले. त्यानंतर चांगदेवभट सर्वज्ञांची धोतरे धुण्यासाठी नदीवर आले. त्यांनी धोतरे धुऊन वाळत घातली. मग वाळवंटातील ओलसर वाळू पायावर घालून दोन देवळ्या तयार केल्या व खेळू लागले, खेळता खेळता ते म्हणत, “ही श्रीगुंडमराउळांची गुंफा, ही श्रीचांगदेवराउळांची गुंफा.” त्याचबरोबर ते दोन्हीही देवांचे नाम उच्चारित वदोन्ही देवळ्यांकडे हात जोडून नमस्कार करीत. अशा या खेळात चांगदेवभट चांगलेच रमले होते. त्यांना परत येण्यास उशीर का लागला; म्हणून सर्वज्ञ स्वत: पाहण्यासाठी येथे आले. चांगदेवभटांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांचा खेळ पाहन, तोषून सर्वज्ञ म्हणाले, “बटीका, खेळ असाच खेळत जा की, ज्या खेळामध्ये ईश्वरस्मरण घडेल.’ (पू. ली. 174, स्था. पो.) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू मंगरूळहून टाकळीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

मंदिर परिसर

अनुपलब्ध स्थान :

1. वहारदेवी वसती स्थान



मंगरूळची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 174
  • Mangrul (Pir) : मांगळौरीं वरहारदेवीं वसति :॥:
  • गोसावी मांगळौरां बीजे केले : तेथ वराहदेवीं चौकीं आसन जालेः बाईसीं श्रीचरणक्षाळन केलेंः गोसावीयांसिं गुळुळा जालाः विडा जाला :॥: (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी ऋद्धपूरवरुन बेलौरां-कारंजा मार्गे आले… येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे :॥:)
  • Purvardha Charitra Lila – 174
  • Mangrul (Pir) : चांगदेवोभटां खेळा अनुमोदन :।।: / चांगदेवोभटां खेळप्रसंगें स्मरणवीधि निरूपण :।।:
  • सवेचि गोसावी चांगदेवोभटातें म्हणितलें: ‘‘बटिकाः खेळा जाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकाः तेवीचि बाबाची वस्त्रे रूळलीं असतिः तियें नेः मां धुनि घेउनि येः’’ गोसावी पहूडु स्वीकरिलाः तें गांवांपूर्वे नदी तेथ कृष्णघाटीं धुआवयासि गेलेः बरवीं धुतलीं: वोपविलीः मागौती वाळो घातलीं: मग वाळवंठीं बैसलेः आणि स्तीति जालीः मां पायावरि ओलसरे वाळुवेचें दोनि देउळे करीतिः तेवीचि दोही देवांचें नांव लवलवां आठवीति आणि म्हणतिः ‘‘हें गुंफा श्रीगुंडमराऊळां गोसावियांचीः हें गुंफा श्रीचांगदेवराऊळां गोसावियांचीः’’ दोहीं देवांचें वेगळालें नांव लवलवा घेउनि म्हणतिः एरएरा गोसावियांचे चरण शरणः ‘‘श्रीगुंडमराऊळ गोसावियांचें चरण शरणः।: श्रीचांगदेवराऊळ गोसावियांचें चरण शरणः।:’’ ऐसें दोहीं देवाचें नांव वेळोंवेळां वाहें वाहें उचारीतिः मग लाहेलाहे म्हणति आणि एरा देऊळाकडें हात जोडीतिः एरा देऊळाकडें हात जोडीतिः ऐसा एरी देउळीएकडुनि एरी देउळीएकडें हात करीतिः एरी देउळीएकडें हात करीतिः परमसंतोखें ऐसा खेळु खेळत असतिः तवं बाइसीं उपहारू निफजविलाः गोसावियांसि उपहूड जालाः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मागुता पहूड उपहूड जालाः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः बटिकु बाबाची वस्त्रें धों गेला असेः तो उशिर लाविलाः आझुनि नेः’’ मग गोसावी तेथ खिडकीद्वारें बिजें केलें: तवं खेळत असतिः गोसावी जाउनी मागां तयाचीये पाठीसीं चरणचारी उभे ठेलेः आणि तयांवरि साइली पडिलीः तेहीं मागुतें पाहिलें: आणि गोसावियांतें देखिलें: आणि उशिर जाला म्हणौनि शंकलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः भेओ नकाः काइ खेळत असाः खेळत असा आणि श्रीप्रभुचें स्मरण करीत असाः तेवीचि यातें आठवीत असाः’’ तेही म्हणितलें: ‘‘जीः’’ तैसेचि उठिलेः गोसावियांसि दंडवतें घातलें: श्रीचरणां लागलें: गोसावी पृष्टिविभागीं श्रीकरू ठेउनि म्हणितलें: ‘‘बटिकाः भेओ नकाः ऐसें होएः ऐसें म्हणिजें हो खेळु खेळिजे तरि ऐसाचि खेळिजेः जें जीवाचें हितः’’ चांगदेवभटीं म्हणितलेः ‘‘हो कां जीः’’ मग तयासमवेत बिढारा बिजें केलें: तेथ वस्ति जाली :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे ऋद्धपूरवरुन बेलौरां-सिराळां-टाकरखेडां-आष्टीवरूण-वाठवडा-नायगाव-मानां-कारंजा मार्गे मांगळौर/मंगरुळला आले.)


Mangrul Pir Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: