Mandavgan (मांडवगण)

मांडवगण, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर


मांडवगण गांवाच्या उत्तरेकडे पूरातन सिद्धनाथाच्या या मंदीरातील प्राचीन आणि दुसऱ्या सभामंडपाच्या बाजुला 1 स्थान आहे व मंदीराजवळ लगतच 2 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

मांडवगण हे गाव, अहमदनगर सोलापूर मार्गावरील मांडवगणफाट्यापासून नैर्ऋत्येस 4 कि. मी. आहे. अहमदनगर ते मांडवगण फाटा 32 कि. मी. व घोगरगाव ते मांडवगण फाटा 4 कि. मी. आहे. श्रीगोंदा ते मांडवगण 30 कि. मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण (रूईछत्तिसीमार्गे) 13 कि. मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण पायमार्गे 9 कि. मी. आहे. मांडवगणला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात एक वेळा व उत्तरार्धात एक वेळा, असे दोन वेळा मांडवगण येथे आले.

1. वसती स्थान :

हे स्थान मांडवगण गावाच्या उत्तरेस गावा लगतच, नदीच्या उत्तर काठावर सिद्धनाथ देवळाच्या आवाराच्या पूर्वेस माळावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात घोगरगावहून मांडवगणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) त्यानंतर ते येथून अरणगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळाच्या ईशान्येचे ओट्यावरील स्थान निर्देशरहित आहे.


2. चिंचा भाजविणे स्थान :

हे स्थान सिद्धनाथ देवळाच्या पूर्वेस आवाराच्या आग्नेय कोपऱ्याच्या बाहेरील बाजूस नदीच्या उत्तर काठावर चिंचेच्या झाडाखाली आहे. हे स्थान उत्तरार्धातील आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली, पहुड झाला. मग भक्तजन जेवले. जेवण झाल्यावर येथे आले आणि त्यांनी चिंचा तोडून खाण्यास सुरूवात केली. उपहुड झाल्यावर सर्वज्ञ येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, “अशा कच्च्या चिंचा खाऊ नका. आंबट लागतील, भाजून खा.” मग भक्तजनांनी विस्तव आणला; आणि चिंचा भाजून खाल्ल्या. (उ.ली.273,स्था.पो.उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. अवस्थान स्थान :

हे स्थान सिद्धनाथाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. देवळाला दोन सभामंडप आहेत. दुसरा सभामंडप प्राचीन आहे. त्या सभामंडपात रिगता डाव्या हाताच्या चौकात दोन खांबांमध्ये हे स्थान आहे. स्थानाचा ओटा नाही.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात घोगरगावहून मांडवगणला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य. तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून नारायणडोहला गेले. सर्वज्ञांनी येथूनच नाथोबांना, साधाला घेऊन येण्यासाठी चिचोंडीला पाठविले. (उ. ली. 274)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. सिद्धनाथाच्या देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


मांडवगणची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: