Mana (माना)

माना, ता. मूर्तिजापूर जि. अकोला


माना येथील 1 स्थान माना गावाच्या दक्षिनेकडे 2 कि.मी.अंतरावर ऊमा नदीच्या पात्रात मंदीरात आहे. या मंदीराला 'माणिकेश्वर मंदीर' म्हणुन संबोधतात.


जाण्याचा मार्ग :

माना हे गाव, अकोला अमरावती मार्गावरील माना फाट्यापासून उत्तरेस 2 कि.मी. आहे. अमरावती ते माना फाटा 42 कि. मी. मूर्तिजापूर ते माना फाटा 14 कि.मी. येळवणहून बोरगावमंजु, मूर्तिजापूर मार्गे मान्याला जाता येते. मान्याला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. भुसावळ-नागपूर लोहमार्गावरील मूर्तिजापूर व बडनेरा मधील माना हे रेल्वेस्थानक आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान माना गावाच्या दक्षिणेस चार फाग अंतरावर उमा नदीच्या मध्यपात्रात पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ‘माणिकेश्वर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नायगावहून मान्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 173, पू. ली.) दुसऱ्या दिवशी ते येथून मंगरूळला गेले.

उमा नदीच्या उत्तर थडीवर मांडलिक स्थान आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


मान्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 173
  • Maana : मानां माणकेश्वरीं वसति :॥:
  • तेथौनि गोसावी माणयासी बीजे केले : बाईसीं नित्यनेम केलाः माणकेश्वरीं वसति जाली :॥: (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी ऋद्धपूरवरुन बेलौरां-नायगाव मार्गे आले. येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे :॥:)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: