Maldhur (माळधुर)

माळधूर ता. तिवसा जि. अमरावती


माळधूर येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) - माळधूर गावातच पश्चिमेकडे शाळेजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

माळधूर हे गाव, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी गावापासून दक्षिणेस 4 कि. मी. आहे. तिवसा ते मोझरी 8 कि. मी. अमरावती ते मोझरी 33 कि. मी. माळधूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तिवशाहून शेंदूरजनाबाजार मार्गेही माळधूरला जाता येते.


स्थानाची माहिती :

1. दांडी खालाविणे स्थान :

हे स्थान माळधूर गावाच्या पश्चिम विभागी मराठी शाळेजवळ उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू नांदगावहून माळधूरला आले. येथे पालखी थांबविली. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा विडा झाला. मग ते येथून शेंदुरजनाला गेले. (ऋ. प्र. 230, स्था. पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


माळधूर चे स्थान : 1


  • Govind Prabhu Charitra Lila – 240
  • Maldhur : माळधरा दांडी खालवणे :॥ तीवसा दांडी खालवणे :॥ सेंदुरजनी दांडी खालवणे :॥वरान उतरौनि भीस्नौरी अवस्थान:॥
  • मग खडकीए दांडी सांडीली : आवी भगवतीजनें टणकली : तीय राहीली : भट माहादाइसें ये दोघे गोसावियांसवें नीगाली : तवं रात्री जाली : मग गोसावी आरचि वरान उतरले : गोसाविया मागें भट माहादाइसें उतरली : तयाचेया आवारासि बीजें केलें : यकादसीचा दीम : तीये अवघीं वेसि घालुनि जागरना गेली होती : मटी वेसि माथां घेउनि उघडीली : माहादाइसी साउले फाडुनि काकडा केला : वाति लावीली : डेरामरि पाणीया तापतु होता : तेणें गोसावियाचे श्रीचरण प्रक्षाळीलें : मग भटाचे पाय धुतले : मग आपुले धुतले : मग मट तयातें बोलवाबया गेले : तयाते महणीतलें : ‘आगा! काइ जागरण करीत असा : राउळ तुमचेया घरासि आले असेति :” मग ते आवघेचि आले : गोसाविया से दंड. बत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियासि मर्दना मादणे जालें : पुजा केली : वन वोळगवीलें : मग आरोगणा जाली : पाट-बाज घालुनि सुपवति घातली : तीयवरि न नीजति : आवषया बाजा धातलीया : तयावरि न नीजति : मग लेकरवें नीजैली होती : मग गोसावी म्हणीतलें : “आवो हे घाल घालि :” म्हणौनि तिय बाजेपासि बीज केलें : मग लेकर उठवीली : मग तीय बाजेकरि पहुड स्वीकरीला : मग म्हणीतलें : “ऐया माशा होय म्हणे :” मी म्हणीतले : ” जी जी! आता को नव्हे : लेंकरुवें तवं उठवीली की “” आवो मेली जाय ” म्हणौनि हास्य केलें : मग मी माहादाइसी आंघोळ केलीया : माहादाइसी मणीतलें : “नागदेया जेवि:” भटौं म्हणीतले : ” तुमी यकादसि मोडाल तरि मी जेवीन : ” संग्रहेन म्हणीतलें : ” ना : हो का: ” मग दोघे जेवीली :॥ २४०।।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: