Madhpimpari (मढ पिंपरी)

मढपिंपरी, ता. जि. अहमदनगर


येथील स्थाने मढपिंपरी गावाच्या पूर्वेकडे सीना नदी आहे, त्या नदीच्या पूर्व काठावर मुख्य स्थाना सहीत 6 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

मढपिंपरी हे गाव, अहमदनगर-सोलापूर मार्गावरील रूईछत्तिसी गावापासून पूर्वेस 4 कि. मी. आहे. तसेच नगर-जामखेड (मांडवा मार्गे) मार्गावरील पिंपळा गावापासून नैर्ऋत्येस 5 कि. मी. आहे. नगर ते रूईछत्तिसी 27 कि. मी. नगर ते पिंपळा 25 कि. मी. नारायणडोह ते पिंपळा 15 कि.मी. नारायणडोहहून दक्षिणेस मढपिंपरी (लोणी सय्यदमीर, कोयाळमार्गे) 15 कि. मी. आहे. हा पायमार्ग होय. महपिंपरीला जाण्यासाठी नगरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. मढपिंपरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान मढपिंपरी गावाच्या पूर्वेस तीन फर्लाग अंतरावर सीना नदीच्या पूर्वकाठी उत्तराभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. स्थानाच्या उत्तर दक्षिण बाजूचे दोन्ही खांब व देवळाच्या दारसंका नमस्कारी आहेत. हे देऊळ, ‘महानुभाव श्रीकृष्ण मंदिर’ तथा ‘मढसाहिब’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात चिचोंडीहून मढपिंपरीला आले. त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. (उ. ली. 267, स्था. पो.) 20 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून वाकीला गेले.

येथील इतर लीळा :

1. नारोबांना वाहाणा घेण्यासाठी पाठविणे. (उ. ली. 268)

2. नारोबांचे ‘पारिपळ’ नाम करणे (उ. ली, 269)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान मढाच्या पूर्व-पश्चिम पटीशाळेवर पूर्व बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे आसन होते. त्यावेळी नारोबा 16 दाम घेऊन आले. मग त्यांनी सर्वज्ञांची, 16 दाम अर्पण करून पूजा केली. (उ. ली. 269, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. सोंडी आसन स्थान :

मढाच्या पूर्व-पश्चिम पटीशाळेच्या पायऱ्याच्या पूर्व बाजूचा जो ओटा आहे. तेच सोंडी आसन स्थान होय. (एका वासनेप्रमाणे पश्चिम बाजचा ओटा)

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे बसलेले होते. त्यावेळी नारोवा करंजखेड्याहून आले. या ठिकाणी त्यांना सर्वज्ञांचे दर्शन झाले. (उ.ली.267,स्था.पो.उ.खा.द.शा.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. वेढे स्थान :

हे स्थान सोंडी आसन स्थानापासून उत्तरेस 6 फूट 3 इंच अंतरावर आहे. (स्था. पो. उ. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. मादने स्थान :

हे स्थान वेढेस्थानापासून नैर्ऋत्येस 8 फूट 5 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळाच्या पश्चिमेचे मांडलिक स्थान आहे.


6. महाद्वार स्थान :

हे स्थान मढाच्या पूर्वेस आवाराच्या आत पूर्व पश्चिम, उत्तराभिमुख पटीशाळेत आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे चरणचारी उभे राहत असत. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान.


मढपिंपरीची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: