Loni (Haveli) (लोणी-हवेली)

लोणी (हवेली), ता. पारनेर, जि. अहमदनगर


हे स्थान लोनी गावाच्या वायव्येकडे बसस्थानकाच्या जवळ सिद्धनाथ महादेव मंदीर आहे. या मंदीरातील सभामंडपात हे 1 स्थान आहे. व दुसरे स्थान तीथेच जवळ आहे. आता सिद्धनाथ महादेव मंदिर महानुभाव गोपाल कृष्ण मंदिरात रुपांतरीत झाले आहे.


जाण्याचा मार्ग :

लोणी हे गाव, अहमदनगर पारनेर (जामगाव मार्गे) मार्गावर अहमदनगरहून नैर्ऋत्येस 33 कि. मी. आहे व पारनेरहून पूर्वेस 5 कि. मी. आहे. लोणीला जाण्यासाठी अहमदनगर व पारनेर येथून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. लोणी येथे तीर्थयात्रेकरुंच्या निवासाची सोय आहे. तसेच मंदिराच्या समोरील बाजूस पं. विश्वनाथव्यास बाळापूरकर या नावाने ओळखला जाणारा महानुभाव मठही आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान लोणी गावाच्या वायव्य विभागी एस. टी. बसच्या थांब्याजवळ सिद्धनाथाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे सभामंडपात आहे. चौक नमस्कारी आहे. आता सिद्धनाथ महादेव मंदिर महानुभाव गोपाल कृष्ण मंदिरात रुपांतरीत झाले आहे. आज हे देऊळ, गोपालकृष्ण’ मंदिर या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सायंकाळच्या वेळेस पारनेरहून लोणीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून जामगावला गेले.(उ.ली.288,स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस 4 फूट 9 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथे रात्री भिक्षेचे अन्न व हरभऱ्याच्या घुगऱ्या आरोगण केल्या. (उ. ली. 288)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या दक्षिणेचे गुरुवाते संबोखणे स्थान.
2. देवळाच्या उत्तरेचे परिथय स्थान.


लोणीची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: