Lonar (लोणार)

लोणार, ता.लोणार जि. बुलढाणा


येथील 4 स्थाने 4 ठीकानी आहेत -
धारेजवळील स्थान - येथील 1 स्थान लोणार सरोवराच्या धारेच्या बाजुस पायरीवर आहे.
आसन स्थान - येथील 1 स्थान लोणार सरोवराच्या पासुन धारेच्या रस्त्यावर कुमारेश्वराच्या देवळाच्या चौकात आहे.
आसन स्थान - येथील 1 स्थान लोणार सरोवराच्या दक्षिनेकडे कमळजादेवीच्या देवळाच्या चौकात आहे.
आसन स्थान - येथील 1 स्थान लोणार गावातच मधोमध दैत्यसुदनाचे पूरतन भव्य मंदीर आहे, या देवळाच्या चौकात हे स्थान आहे. (येथील पूजारी/लोक विचारल्यास सांगतात, किंवा येथे कोठेही चंदन लावलेले नसते त्यामुळे स्थान ओळखता येत नाही.)


जाण्याचा मार्ग :

लोणार हे गाव, शेंदूरजहून आग्नेयेस (मलकापूर पांग्रा, बिबी, सुलतानपूरमार्गे) 41 कि.मी. आहे व खळेगाव, सुलतानपूर मार्गे 30 कि.मी. आहे. मेहकर ते लोणार पायमार्गे (खळेगाव, उदनापूर, शारा मागे) 23 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. दैत्यसुदनाच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान लोणार गावाच्या पश्चिम विभागी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक कन्याशाळेजवळ दैत्यसुदनाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक डाव्या हाथावर आहे, चौक नमस्कारी आहे. देवळाला एकूण तीन दरवाजे आहेत. एक पूर्वाभिमुख, एक उत्तराभिमुख, एक दक्षिणाभिमुख, देवळाची इमारत प्राचीन व भव्य असून त्यावर कोरीव नक्षीकाम आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात बोणेबाइयांच्या सोबत मेहेकरहन लोणारला आले. दैत्यसुदनाच्या वायव्य कोपऱ्यात गुंफा होती. तेथे बोणेवाइया व सर्वज्ञ मुक्कामाला थांबले. दुसऱ्या दिवशी विहरणाला जाऊन आल्यावर दैत्यसुदनाच्या देवळाच्या चौकात त्यांना आसन झाले. (पू.ली. 99 स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. धारेपाशील आसन स्थान :

हे स्थान दैत्यसुदनाच्या देवळाच्या पश्चिमेस 600 मीटर अंतरावर लोणार सरोवराच्या वरच्या बाजूला धारेच्या पश्चिम बाजूस आहे. स्थानाचा ओटा नाही. (धारेकडे जाण्याचा रस्ता विचारणे.)

लीळा : सर्वज्ञांना गोमुखाच्या पश्चिम बाजूस पूर्वाभिमुख आसन झाले होते. (एकांक लीळा 88 ख प्रत. स्थान पोथी) जेथून पाण्याची धार पडते, तेथे चरणांकित गोमुख होते; परंतु नमस्कारी गोमुख आज अस्तित्वात नाही, सध्या फक्त दगडी पन्हाळ आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. कुमारेश्वराच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान धारेच्या दक्षिणेस 200 मीटर अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात लोणार सरोवराकडे जाताना पाऊलवाटेच्या दक्षिण बाजूस कुमारेश्वराच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. देवळाच्या चौकाला एकूण तीन दरवाजे आहेत. एक पूर्वाभिमुख, एक दक्षिणाभिमुख, एक उत्तराभिमुख. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. धारेच्या दक्षिणेचा घाट उतरून कुमारेश्वराकडे जाणे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू बोणेबाइयांच्या सोबत लोणारला आल्यावर ते प्रथम येथे आले. त्यांना देवळाच्या चौकात आसन झाले. बोणेबाइया सर्वज्ञांच्याजवळ मात्रा ठेवून अष्टतीर्थी करण्यास गेल्या. त्या अष्टतीर्थी करून येईपर्यंत सर्वज्ञांना येथेच आसन होते. त्यानंतर ते बोणेबाइयांच्या सोबत धारेकडे गेले. (पू. ली. 99, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. कमळजादेवीच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान कुमारेश्वर देवळापासून दक्षिणेस 1 कि.मी. अंतरावर लोणार सरोवराच्या दक्षिण काठाला लागून असलेल्या कमळजादेवीच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. देवळाच्या चौकाला एकूण तीन दरवाजे आहेत. एक उत्तराभिमुख, एक पूर्वाभिमुख, एक पश्चिमाभिमुख. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. भैरवी अवस्थान स्थान.

2. भैरव देवळाच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान.

3. कमळजेच्या देवळाच्या उत्तर सोंडीवरील आसन स्थान.

4. तारातीर्थाच्या दक्षिणेचे वडाखालील आसन स्थान.

5. गणेशाचा साजा आसन स्थान.

6. घाटाचे चौकटी आसन स्थान.

7. दैत्यसुदनाच्या वायव्य कोपऱ्याच्या गुंफेतील वसती स्थान.

8. ओहळाकाठचे भोजन स्थान.

9. गावाचा वायव्य कोनी पव्हेयातील वसती स्थान.


लोणारची एकूण स्थाने : 13


  • Purvardha Charitra Lila – 99
  • Lonar : सोमवारीये लोणारां जाणें :।।: / सोमवारीये लोणारां गमनीं मढीं वस्ति :।।:
  • एकु दीं सोमवारी आलीः गोसावी सकाळी विहरणा बिजें करीत होतें: तवं बोणेबाइ गोसावियांतें विनविलें: ‘‘बा मौन्यदेयाः आजी सोमवारीः अवघा लोकु लोणारासि निगाला तरि आपण लोणारासि जावोना?’’ गोसावी मानिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ चालाः घेया मात्राः’’ बाइं अवघी आइती केलीः मात्रा घेतलीः मग गोसावी बिजें केलें: गोसावी उजूचि कुमारेस्वरां बिजें केलें: कुमारेस्वरीं आसन जालें: बाइया गोसावियांपासी मात्रा ठेउनि अष्टतीर्था करौनि आलीयाः मग गोसावी बाइयासहित धारेसि बिजें केलें: पटिशाळे आसन जालें: तेथ तेही मात्रा ठेविलीः धारे गोमुखावरि सीळ होतीः मग तियेवरि लोंबता श्रीचरणी आसन जालें: गोसावी गोमुखीं धारे श्रीचरण ओडविलें: तेथ बाइया स्नानें केलीः अवघेयां लोका स्नानें जाली तवं तेथ गोसावियांसि आसन असेः मग गोसावियांसि साजां आसन जालें: तिया कुंडासि प्रदक्षिणा करौनि आलीयाः परिवंट बांधलेः मात्रा घेतलीः ‘‘बा मौन्यदेव होः आतां गावांतुं चालाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः चालाः’’ मग गोसावी गावांतु दैत्यसूदनासि बिजें केलें: चौकीं आसन जालें: दैत्यसूदना वाव्यकोनीं मढुः तेथ बाइया बिढार घेतलें: बिढाराहुनि गोसावी मागुतें धारेसि बिजें केलें: आसन जालें: मग बाइया बिढारी उपहारू निफजविलाः आणि गोसावीयांतें विनउनी तेथ घेउनि गेलियाः तेथ गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तेथ बाइया मात्रा ठेविलीः आणि कुंडा प्रदक्षिणे गेलियाः मग तयासि आलेयागोसावी दैत्यसूदनासि बिजें केलें: तेथ गोसावियांसि वस्ति जाली :।।: (टिप – येथे हे पहील्यांदा येने. पहील्यांदा स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वडनेर, वासनी, इसवि, अंजनि, मेहकरला परत आले. मेहकर वरुन लोणारला आले…)
  • Purvardha Charitra Lila – 61
  • Lonar : लोनारीं कुंडीं राजेया दरीसन :।।: / राजेया भेटिः पूजा स्वीकारू :।।:
  • गोसावी सेंदुर्जन प्रदेशी क्रीडता एक वेळ लोणारासि बीजें केलें: लोणार कुंडी बहीरवी गोसावियांसि एक मास अवस्थान जालेः गोसावी घाटेचि जातिः धारेसी गोमुखी गोसावियांसि आसन होएः मग गणेशाचा साजा आसन होएः तेथ देउळ देउळी विहरणः दोन्ही धारा विहरणः गावांत दैत्यसूदनी विहरणः गावांतुल बाहीरिल देउळी विहरणः देवालया महाद्वारी विहरणः धारे उत्तरे धारकियाचे घरः तेथ गोसावी पाणिपात्र करीतिः कदाचित नगरांत पाणिपात्र करौनि कुमारेस्वरा दक्षिणे वोहळासी आरोगणा करीतिः ऐसें सकळ देउळी विहरण करीतिः ऐसां एकु दिसीं गोसावी कुमारेस्वरा विहरणा बिजें केलें: तेथ गोसावियांसि आसन जालें: तवं राणेनि गोसावियांचें लावण्यः सौंदर्य देखिलेः तोखलाः एकु दीसु गोसावियांसि तारातीर्थाचेया वडातळीआसन असेः तियें दीं सोमवारीं: कान्हरदेवो रावो सोमवारीकारणें लोणारां कुंडासि आला होताः मां कुंडीं स्नान केलें: अष्टतीर्था केलियाः कांहीं द्रव्य वेचीलें: मग काही वेचावाचेनि मनोर्थे गुरुवातें पुसिलें: ‘‘राणे हो एथ अपूर्व काइ? एथ कव्हणी सिद्धसाधक असति?’’ गुरुवें सांघितलें: ‘‘इश्वरपुरूख एक बहीरवीं आले असतिः’’ मग राणेनि वाखाणिलें: ‘‘काइं सांघों तयांचे सौंदर्यः काइं सांघों तयाचे चातुर्य आणि तयांचा ठाइ सामथ्र्येहीं असतिः किंबहुना तें सद्गुणसंपन्नः’’ ऐसें अनेगी शब्दी गोसावियांसि विशेषुं लागलाः तवं तें परिसौनि रावो चमत्करलाः तयासि थोर उत्कंठा संचरलीः कान्हरदयासि ऐसें जालें जेः ‘ते पुरूख कव्हणे ठाइं भेटतिः केव्हेळी केव्हेळी भेटतिः’ तैसाचि कान्हरदेवो प्रदक्षिणा करावया आलाः सरिसी कुमरावपी असें: कुमरी राणीवसा असेः महादेवरावो धाकुटाः हाती कोलु ऐसा असेः प्रदक्षिणा करितां तारातीर्थासि आलाः तवं गोसावियांसि तारातीर्थाचिया वडातळी आसन असें: सरिसा तो बडुवा असेः रायें देखिलें: आणि बडुवातें पुसिलें: ‘‘ते हें पुरूख?’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो जीः तें हें पुरूखः’’ तैसाचि कान्हरदेवो साउमा आलाः हडपेयातें पानेपोफळे मागितलीं: पुढें ठेविलीं: भांडारीयातें आसूची वाखारी मागितलीः आंजुळी भरूनि आसूचा पुंजा दरीसना केलाः मग दंडवत केलें: श्रीचरणावरि माथा ठेविलाः मग करपुटें जोडुनि सेवकवृत्ति उभा राहिलाः कान्हरदेया जवळीलीं भाटीं साचोला म्हणितलें: ‘‘देव हो घेया घेया सिंगणाचा कान्हु प्रसन्न जालाः’’ गोसावी भुमी येउतें पाहिलें: पाषाणाची वास पाहिलीः आणि रायाची वास पाहिलीः सवेंचि द्रव्यायेउतें पाहिलें: भाट अधिकाचि गर्जाे लागलेः ‘‘घेइजो जीः सिंघणाचा कान्ह तुम्हासि प्रसन्न जालाः’’ रावो जाणताः तेणें जाणितलें: ‘यासि सोने तैसी मातीः द्रव्यासी आणि पाषाणासि आणि मज सरीचि केलीः’ आणि रायें म्हणितलें: ‘‘सरा रे परतेः ऐसें काइ म्हणत असा रे? सिंगणाचा कान्हु तो तुम्हासि कीं: यांसि काइ कान्हु? यांसि रावो तैसा रंकुः सुवर्ण तैसी मृत्तिकाः उगे असाः’’ मग रावो पुसौनि निगालाः पैर्‍हां गेलाः मग तेणें तया द्रव्यासि दिठीचें राखण घातलें: सेवकातें म्हणितलें: ‘‘हे द्रव्य घेति की नेघेति म्हणौनि गुप्त होउनि पाहात असाः’’ सेवकें म्हणितलें: ‘‘हो कां:’’ गोसावी नावेक आसनी उपविष्ट होतें: मग गोसावी तें परीत्यजूनि कमळजे मागे बहीरवाचे देउळ तेथ बिजें केलें: राखत होतें तें आसूची वाखारी घेउनि रायापासी गेलेः सांघितलें: ‘‘रायाः तें पुरूख आसूची वाखारी नेघतीचिः’’ ‘पुरूख कैसे विरक्तः’ म्हणौनि रावो अंतःकरणीं तोखलाः रायें म्हणितलें: ‘‘हें द्रव्य भांडारीं घालू न येः हें चंडीस्वः काइं करावे?’’ रायें म्हणितलें: ‘‘गोसावियांतें पाहा पां रेः मग पुसों:’’ पाहावेया गेलें: तवं न देखतीचिः मग तिसरां दिसीं कुमारेस्वराचां देउळीं भेटि जालीः मग रायें पुसिलेः ‘‘जी जीः हें द्रव्य काइ करूं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कुमारेस्वराची पौळी कराः कमळजेचा मंडपु कराः उरलें द्रव्य तेणें चुना सारावाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः रावो आस्तिकुः उद्देशिलें द्रव्य भांडारीं न घलीचिः’’ कुमारेस्वराची पौळी केलीः चुना सारिलाः एक महानुभाव म्हणतिः धारेचा घाटु बांधलाः कमळजेचा मंडपु केलाः हें गोष्टि गोसावी एळापूरीं राजादरीसन प्रसंगी बाइसां देमाइसाप्रति निवेदिली :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: