Limba-Ganesh (लिंबागणेश)

लिंबा (गणेश), ता. बीड, जि. बीड.


येथील स्थान लिंबा गावाच्या दक्षिणेस असलेल्या मंदीरात हे 2 स्थान आहे. व 1 वासना भेदाचे स्थान गावाच्या पश्चिमेस लिंगाच्या देवळात आहे.


जाण्याचा मार्ग :

लिंबा (गणेश) हे गाव, पाटोदा मांजरसुंभा-परळी मार्गावर पाटोद्याहून पूर्वेस 19 कि.मी. आहे. व मांजरसुंभ्याहून नैर्ऋत्येस 9 कि.मी. आहे. मांजरसुंभा हे गाव, बीड-सोलापूर राज्यमार्गावर बीडहन दक्षिणेस 19 कि.मी. आहे. लिंबा (गणेश) येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 2 स्थान एकाच मंदिर परिसरात आहेत.)

1. वसती स्थान :

हे स्थान लिंबा गावाच्या दक्षिणेस गावालगतच पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पोहीहून लिंब्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली.323,स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून पाटोद्याला गेले.


2. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या नैर्ऋत्येस पूर्वाभिमुख देवळात आहे.


3. वसती स्थान (वासना भेद) :

हे स्थान लिंबा गावाच्या पश्चिमेस गावालगतच असलेल्या लिंगाच्या पूर्वाभिमुख देवळात आहे.

एका वासनेप्रमाणे येथे सर्वज्ञांना वसती झाली. (पू. ली. 261 क. प्र.,स्था. पो. उ. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

वसती स्थानापासून वायव्येस 200 मीटर

लिंब्याची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 323
  • Limba (Ganesh) : निंबा बाहिरीली देउळीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी बिडला ४ महिने वास्तव्य करुन पाली-पोहिचादेववरुन निंब्याला आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: